Site icon Tufan Kranti

विशाळगडावरील हल्याच्या मिरज शिवसेनेच्यावतीने निषेध;उच्च स्तरीय चौकशीची मागणी

मिरज:
विशाळगड येथील अतिक्रमणाच्या नावावर गजापुर येथे केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मिरज शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने मिरज येथे प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मिरज शिवसेनेचे नेते चंद्रकांत मैगुरे यावेळी बोलताना म्हणाले की विशालगड येथील प्रकार निंदनीय आहे.सरकार च्या पायाखालची जमीन सरकली आहे म्हणून सरकार जातीय दंगली घडवण्याचे षडयंत्र करत असल्याचा आरोप चंद्रकांत मैगुरे यांनी केला.
शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र तानाजी सातपुते यांनी सदर प्रकरणाची एस आय टी चौकशी करण्याची मागणी केली.तर  विशाल राजपूत यांनी विशाळगढ वर जे हल्ला  झाला या घटनेची C.B.I. चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. त्याच बरोबर काश्मीर मध्ये जवानंवर  झालेल्या हल्ल्याचा यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला.यावेळी संजय काटे, तानाजी सातपुते, अतुल रसाळ, महादेव मगदूम,कुबरसिंग रजपूत,पप्पू शिंदे, शकिरा जमादार, शकील पिरजादे, यांच्यासह उध्दव ठाकरे गटाचे मिरज शहरातील कार्यकर्ते व हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Exit mobile version