Tufan Kranti

वडखळ येथे सावली लॉज व्यवस्थापकाची गळा चिरून हत्या !

गडब / सुरेश म्हात्रे
रायगड जिल्ह्यातील वडखळ येथे सावली लॉजचे व्यवस्थापक धर्मेद्र कुशवाह (वय- ४० वर्षे, धंदा- सावली लॉज, सध्या सावली लॉज व्यवस्थापक रा. वडखळ नाका, ता. पेण, जि. रायगड) यांची हत्येप्रकरणी वडखळ पोलिस ठाण्यात संदिप बाळू पाटील (वय ४२ वर्षे व्यवसाय- चालक गंधर्व हॉटेल वडखळ नाका, सध्या रा. गंधर्व हॉटेल वडखळ, ता पेण, जि. रायगड रा. मु.पो. गवसे, ता, चंदगड, मुळ जि. कोल्हापूर) यांनी FIR दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, पेण तालुक्यातील वडखळ येथे दिनांक ०६/२/२०२४ रोजी २०.०० वा. ते वेळदि.०७/०२/२०२४ रोजी ००.३५ वा. चे दरम्यान मौजे सावली लॉज रूम नं. ११५ मध्ये सावली लॉज व्यवस्थापक धर्मेद्र कुशवाह यांची कोणीतरी अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राच्या सहाय्याने त्यांचा गळा कापून गंभीर जखमी करून त्याचे गुप्तांग लिंग कापून त्याच्या डोळयावर ठेवून त्यांची हत्या केली आहे.
वडखळ येथे सावली लॉज व्यवस्थापकाची गळा चिरून हत्या !
या हत्येची माहिती मिळताच पेणचे उपविभागीय पोलीस अधिकारी फडतरे यांनी भेट देवून घटनेची पाहणी केली आहे.याबाबत वडखळ पोलिस ठाण्यात गुन्हा .रजि.नं.व कलम-१२/२०२४ भा.द.वि.सं.कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास वडखळ पोलिस ठाण्याचे पो.नि. प्रसाद पांढरे हे करीत आहेत
Exit mobile version