Site icon Tufan Kranti

वासुद विकास सेवा सोसायटीवर भाजपचा झेंडा

चेअरमनपदी आण्णासाहेब केदार-सावंत तर व्हा. चेअरमनपदी बाळासाहेब भोसले यांची बिनविरोध निवड

सांगोला /प्रतिनिधी:

सांगोला तालुक्यातील वासुद विकास सेवा सोसायटीवर भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजपने झेंडा फडकवला आहे. वासुद विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी आण्णासाहेब एकनाथ केदार-सावंत तर व्हा.चेअरमनपदी बाळासाहेब भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडीनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला.
भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या नेतृत्वाखाली वासुद विकास सेवा सोसायटीची निवडणूक बिनविरोध करण्यात भाजपला यश आले आहे. या निवडणुकीत वासुद विकास सेवा सोसायटीवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करीत भाजपने झेंडा फडकवला आहे. वासुद विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी आण्णासाहेब एकनाथ केदार-सावंत तर व्हा.चेअरमनपदी बाळासाहेब भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडीनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला.
यावेळी जय हनुमान हायस्कूलचे संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब केदार सावंत, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, वासुदचे सरपंच अरुण केदार, उपसरपंच अनिल उर्फ बंडू केदार, माजी सरपंच भीमराव सावंत, पांडुरंग खटकाळे, मोहन साळुंखे, विष्णुपंत केदार, नानासो केदार, माजी चेअरमन सूर्यकांत सावंत, भारत केदार, प्रकाश केदार, संभाजी चव्हाण, सोसायटीचे सदस्य काशिनाथ राऊत, अंकुश सावंत, मधुकर पवार, रुक्मिणी पवार, भागवत केदार, बाळासाहेब भोरे, सेनापती केदार, भारत केदार, मारुती केदार, विश्वंभर केदार, सोमनाथ पवार, प्रकाश केदार, तानाजी खटके, सोमनाथ गायकवाड, शंकर केदार, सौदागर केदार, बाळासो केदार, सेनापती केदार, पांडुरंग केदार, शिवाजी केदार, विठ्ठल केदार, वसंत केदार, गोरख केदार, जितेंद्र जाधव, सुनील भोरे, अजय गोडसे, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version