Site icon Tufan Kranti

चिमुकलीच्या उपचारासाठी मिळाले समरजितसिंह घाटगेंचे सहकार्य

मदतीबद्दल आभार मानून व्यक्त केली कृतज्ञता
मुरगुड,प्रतिनिधी.
 शाहू ग्रुपचे अध्यक्ष  राजे समरजितसिंह घाटगे यांच्या प्रयत्न व सहकार्याने सुरुपली (ता.कागल)येथील दीड वर्षाच्या चिमुकल्या मुलीस ह्दय शस्त्रक्रियेसाठी आर्थिक  मदत मिळाली. सृष्टी बाबुराव कुंभार असे तिचे नाव आहे.मुलीच्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत मिळवून दिल्याबद्दल नातेवाईकांनी आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली.
  याबाबत अधिक माहिती अशी.येथील  बाबुराव कुंभार यांची दीड,वर्षाची मुलगी सृष्टीच्या हृदयाला तीन छिद्रे होती.त्यामुळे ती सतत आजारी असायची.बेळगाव येथील  रुग्णालयात तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यासाठी सात लाख रुपये खर्च आला.वेल्डिंग व्यवसाय करणाऱ्या कुंभार यांना इतकी रक्कम एकावेळी कशी जमा करायची अशी विवंचना होती.त्यांनी पै- पाहुण्यांकडून उसनवार घेऊन काही रक्कम जमा केली. मुख्यमंत्री सहायता निधीतून या उपचारासाठी शासनाकडून मदत मिळावी.यासाठी त्यांनी श्री घाटगे यांची भेट घेतली.त्यानुसार श्री घाटगे  यांनी पाठपुरावा केला व मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एक लाख रुपयांची मदत त्यांच्या खात्यावर जमा झाली.
 या चिमुकलीचे ऑपरेशन झाल्यानंतर आता ती ठणठणीत बरी झाली आहे.आजारपणामुळे अंथरुणातच पडून असणारी सृष्टी आता घरात दूडूदूडू धावते,खेळते.तिच्या बाललिलांनी कुंभार कुटुंबीय आनंदीत झाले आहे.मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत मिळवून दिल्याबद्दल कुंभार कुटुंबीयांनी श्री घाटगे  यांना घरी चहापानासाठी निमंत्रण दिले होते. त्यानुसार या परिसरात संपर्क दौऱ्याच्या निमित्ताने गेल्यावर श्री घाटगे कुंभार यांच्या घरी गेले. सृष्टीची त्यांनी आपुलकीने विचारपूस केली.
यावेळी केरबा कुंभार मंगल कुंभार गीता कुंभार यांच्यासह संपूर्ण कुटुंबीय उपस्थित होते.
छायाचित्र- सुरूपली ता कागल येथील  हृदय शस्त्रक्रिया यशस्वी झालेल्या सृष्टी या चिमुकलीच्या कुटुंबीयांसमवेत शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे
कोट
..हे तर माझे कर्तव्यच- समरजितसिंह घाटगे
वेगवेगळ्या कामासाठी नागरिक भेटतात. शासन पातळीवर पाठपुरावा करून त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी यशस्वी पाठपुरावा करीत आहोत.अडचणीत असलेल्या नागरिकांना सहकार्य करणे हे तर माझे कर्तव्यच आहे. अशी प्रतिक्रिया यावेळी श्री घाटगे  यांनी दिली.
Exit mobile version