सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाची सीसीटीव्ही यंत्रणा ८ महिने बंद

आरटीआय कार्यकर्ते महेश शिंदे यांनी मागवली माहिती अकलूज: आपल्या वैयक्तिक माहिती करीता माहिती अधिकार कार्यकर्ते महेश शिंदे यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकड़े सीसीटीव्ही यंत्रणेची माहिती मागवली असता जिल्हाधिकारी कार्यालयाकडुन महेश शिंदे यांना असे कळविण्यात आले की, मार्च २०२४ ते ऑक्टोंबर २०२४ या कालावधीमध्ये काही तांत्रिक अडचणीमुळे एन.व्ही. आर. बंद असल्या कारणामुळे रेकॉर्डींग झाले नाही. महेश शिंदे … Read more

अखेर बोगस डॉक्टरांविरुद्ध कारवाई; वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष रोहित लालसरे यांच्या प्रयत्नांना मिळाले यश

सोलापूर: दक्षिण सोलापूर तालुकायला तांदुळवाडी गावात बोगस डॉक्टरविरुद्ध कारवाई झाली असून, मल्लिकार्जुन भिमाशंकर कुंभार (वय ६३) यांच्यावर बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय केल्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखालील तालुका बोगस डॉक्टर दक्षता समितीने या प्रकरणात कारवाई केली, ज्यात कुंभार रुग्णांवर उपचार करताना आढळले. तपासणीदरम्यान त्यांच्याकडे आवश्यक वैद्यकीय प्रमाणपत्र नसल्याचे समोर आले आहे. … Read more

सोलापूरची गोल्डन नगरसेविका विधानसभेच्या मैदानात ; मंगळवारी भरणार अर्ज

सोलापूर: निवडणूकीची तारीख जशी जवळ येईल तशी शहर मध्य मतदार संघातून इच्छूक उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सोलापूर शहर – जिल्ह्यासह राज्याचे लक्ष विशेषत : मध्य मतदार संघाकडे लागून राहिले आहे. चर्मकार समाजाच्या माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे ह्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. शहर मध्य मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे फुलारे यांनी … Read more

आगामी विधानसभा निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी सोलापूर ग्रामीण व सांगली जिल्हयातील पोलीस अधिकाऱ्यांची जिल्हा बॉर्डर मिटीग

सोलापूर: आगामी विधानसभा निवडणूक २०२४ ही शांततेत, भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी व निवडणुक कार्यकाळात गुन्हे करणाऱ्या गुन्हे गारांचा बंदोबस्त करण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस व सांगली जिल्हा पोलीस यांची संयुक्त बैठक शुक्रवार दिनांक १८/१०/२०२४ रोजी १२:०० वा. ते १५:०० वाजता सिंहगड इन्स्टीट्युट, कमलापूर येथे पार पडली. सदर बैठकीमध्ये सोलापूर व सांगली सीमाभागातील सराईत गुन्हेगार, पाहिजे व … Read more

बाप-लेकाचे अपहरण  करणारे तिघे अटकेत

कर एक किलो सोन्याची मागणी; मोबाईल क्रमांकावरून पोलिसांना सुगावा फौंजदार चावडी पोलिसांची धडाकेबाज कारवाई सोलापूर: एक किलो सोन्याच्या खंडणीसाठी बाप लेकाचे अपहरण केल्याप्रकरणी तिघांना फौजदार चावडी पोलिसांनी अटक केली आहे.महेश गजेंद्र शिंगाडे, (रा. मुळेगांव, ता.दक्षिण सोलापूर, उमेश अंकुश बंडगर, शंकर ऊर्फ दादा अनिल माशाळकर (दोघे रा. इटकळ, ता. तुळजापूर) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. तर … Read more

सोलापूर चे नूतन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी 

सोलापूर/प्रतिनिधी: राज्यातील 29 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याचा आदेश महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने काढला आहे त्यामध्ये सोलापूर ग्रामीण चे पोलीस अधीक्षक शिरीष सर देशपांडे यांची बदली लाच लूचपत विभाग पुणे अधीक्षक पदी तर त्यांच्या जागी सोलापूरचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून धाराशिव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्र शासनाने भारतीय पोलीस … Read more

नळदुर्ग येथे पोलीस असल्याची बतावणी करुन तोतयागिरी;सोलापूरच्या दोन भामट्याना नळदुर्गमध्ये अटक

नळदुर्ग/प्रतिनिधी:   तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे पोलीस असल्याची बतावणी करुन तोतयागिरी करणाऱ्या सोलापूरच्या दोन भामट्याना नळदुर्ग पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी नामे-जुनेद हबीबोकद्दीन चंदा, रा. सोलापूर, मुनिर रियाज रंगरेज रा.कुंभारी ता. दक्षिण सोलापूर जि. सोलापूर यांनी दि. 12.06.2024 रोजी 04.30 वा. नळदुर्ग शिवारातील शेत गट नं 59/2 येथे फिर्यादी नामे- रहीम … Read more

सोलापूर जिल्ह्यात दमदार पावसाने नदी, नाल्यांना पाणी; ओढ्यात तिघे वाहून गेले; दोघे बचावले, तिसरा बेपत्ता

सोलापूर : मृग नक्षत्राला सुरूवात झाल्यापासून सोलापूर जिल्ह्यात दररोज पावसाच्या दमदारी सरी कोसळत आहेत. बुधवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत सरासरी ३०.१ मिलीमीटर पाऊस झाला असून माढा व बार्शीसह उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर,  करमाळा आदी भागात पावसाचा जोर दिसून येतो. या पावसामुळे नदी, नाले, ओढे दुथडी भरून वाहात आहेत. मात्र दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथे ओढ्यावरील … Read more

सोलापूर जिल्ह्यात दुष्काळात पाणीप्रश्न गंभीर

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीनंतर दुष्काळी प्रश्नावर जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने पाऊल टाकत उपाययोजना आखायला सुरूवात केली आहे. सध्या जिल्ह्यात पाणी प्रश्नावर शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असताना १३७ गावे आणि ९१२ वाड्यांवर राहणारे तीन लाख ७६ हजार ९८७ लोक पाण्याविना तहानलेले आहेत. त्यांच्यासाठी १६७ टँकर वापरून पाणीपुरवठा होत आहे. मात्र दुसरीकडे जिल्ह्यात ४२ लाख ८६ … Read more

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी, पदयात्रा काढत प्रणिती शिंदेंचे जोरदार शक्तीप्रदर्शन 

सोलापूर लोकसभेचा विजय तुम्हा सर्वांचा असेल – प्रणिती शिंदे  सोलापुरच्या विकासासाठी, सोलापुरच्या लेकीला मतदान करा, प्रणिती शिंदेंचे आवाहन  हे मतदान लोकशाहीसाठी, संविधानसाठी, महागाई कमी करण्यासाठी, सोलापूरच्या विकसासाठी, आरक्षणासाठी, गोरगरिबांसाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी आहे. या लढ्यात आपण सर्वांनी साथ दिली. खांद्याला खांदा लावून ही लढाई माझ्यासोबत लढलात. आता येत्या 7 तारखेला हाताच्या चिन्हासमोरील बटन दाबून मतदान … Read more

‘झलक दिखला जा 11’वर अत्यंत गंभीर आरोप, लोकांचा संताप, शिव ठाकरेचे चाहते आक्रमक TOP POINTS Farmer’s Protest: Continuing Until Demands Met Best Phones Under 20,000 Top 10 Wireless Earbuds Under 2000