नळदुर्ग/प्रतिनिधी:
तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे पोलीस असल्याची बतावणी करुन तोतयागिरी करणाऱ्या सोलापूरच्या दोन भामट्याना नळदुर्ग पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी नामे-जुनेद हबीबोकद्दीन चंदा, रा. सोलापूर, मुनिर रियाज रंगरेज रा.कुंभारी ता. दक्षिण सोलापूर जि. सोलापूर यांनी दि. 12.06.2024 रोजी 04.30 वा. नळदुर्ग शिवारातील शेत गट नं 59/2 येथे फिर्यादी नामे- रहीम इस्माईल सय्यद, वय 54 वर्षे, रा. अक्कलकोट रोड नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी आम्ही पोलीस आहे असे खोटे सांगून तुझ्या भाच्याने मुनिर रंगरेज यांच्या भाचीला सोलापूर मध्ये रमजान महिन्यात छेडछाड केल्याचा गुन्हा दाखल आहे असे खोटे बोलून गुन्हा मिटवून घेणेसाठी 50,000 ची मागणी केली.
ते नाही दिल्यास फिर्यादीचा भाच्चा नवाज सय्यद यास घेवून जाण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- रहीम सय्यद यांनी दि. 12.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.द.वि.सं.कलम 385, 170, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. 7 News 24 यूट्यूब चैनल चे पत्रकार असल्याचं निष्पन्न झाले. त्या दोन्ही व्यक्तींना पोलीस स्टेशनमध्ये चौकशी केली असता मुस्कान सत्तार शेख या व्यक्तीने आम्हाला पैसे देऊन या ठिकाणी मारहाण करण्यास पाठवलेलं असल्याचं कबुली दिली आहे. तोतया पोलिसां वरती आता पोलीस सखोल चौकशी करून आतापर्यंत अनेक कृत्य केल्या असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे यांच्या पाठीशी असलेल्या मुख्य सूत्रधारांना बेड्या ठोकणार का याकडे मात्र सर्वांचे लक्ष?