Site icon Tufan Kranti

सिरोंचा तालुक्यातील विविध समस्या घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वतीने तहीलदारांना निवेदन

सिरोंचा तालुक्यातील विविध समस्या घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वतीने तहीलदारांना निवेदन
सागर मूलकला / सिरोंचा,गडचिरोली 
सिरोंचा :- सिरोंचा तालुक्यातील विविध समस्या घेऊन आज रोजी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वतीने तहीलदार जितेंद्र सिकतोडे यांना निवेदन देण्यात आली आहे,
            महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांच्या आदेशाने पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतूल गण्यारपावर यांच्या मार्गर्शनाखाली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वतीने प्रशासनाला निवेदन देखील देण्यात आली आहे,
              निवेदनात म्हटले की गडचिरोली जिल्हासह सिरोंचा तालुक्यातही अनेक समस्त बेरोजगारांना रोजगार नाही, शेतकऱ्यांचा धान उत्पादक, मिर्ची, कापूस, माक्का या पिकासाठी योग्याते धार शेतकऱ्यांना मिळत नाहीत,
            महिलांना रोजगार उलब्ध नाही, इतर क्षेत्रात जाऊन काम करावे लागत आहे,
                श्रावणबाळ, आणि संजय गांधी निराधार योजनेची लाभार्थ्यांना वेळेवर लाभ मिळत नाही, आणि तेलंगणा राज्यात जे अनुदान मिळत आहेत त्याप्रकारे मिळण्यात यावे, मेडीगड्ड धरणातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना उर्वरित आर्थिक मोबदलाहि तत्काळ देण्यात यावे, तालुक्यात BSNL नेटवर्क नसून अनेक विभागात नागरिकांना मोठी अडचण निर्माण होत आहे,       सिरोंचा ग्रामीण रुग्णलयामध्ये दांत वैद्यकीय अधिकारी यांचे हप्त एक दिवस तरी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात यावे, तसेच रुग्णालयातील अनेक रिक्त आसलेल्या पदे भरण्यात यावी, शालेय विद्यार्थ्यांना वेळेवर बस सेवा उपलब्ध करून द्यावे,तालुक्यातील मन्नेवार समाजाचे लोकांना जात वैद्याता प्रमाणपत्र देण्यात यावे,
असे अनेक समस्त घेऊन तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वतीने तालुका अध्यक्ष – फाजील पाशा यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे महिला अध्यक्ष – लीना मोर्ला,पदाधिकारी सागर मुलकला, कृष्णकुमार चोक्कामावार, विनोद नायडू , कलाम सय्यद, सलाम सय्यद, सलमान शेख,
व कार्यकर्त्यांनी निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे,
Exit mobile version