Site icon Tufan Kranti

पहेला ते अंभोरा पुलिया पर्यटन स्थळी जाणाऱ्या डांबरीकरण व सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे -चौकशीची मागणी

पहेला ते अंभोरा पुलिया पर्यटन स्थळी जाणाऱ्या डांबरीकरण व सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे -चौकशीची मागणी

७.६० किलोमीटर रस्त्याच्या बांधकामाकरता  24.90 कोटी निधी मंजूर

दैनिक तुफान क्रांती संजीव भांबोरे जिल्हा प्रतिनिधी यांनी घेतलेली प्रत्यक्ष मुलाखत
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)-पहेला ते अंभोरा तीर्थक्षेत्र पुलाकडे जाणाऱ्या ७.६० किलोमीटर  रस्त्या बांधकामाकरता 24.90 कोटी रुपये मंजूर झाले असून त्या रस्त्याचे भूमिपूजन केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले  व रस्त्याच्या बांधकामाला सुद्धा सुरुवात झालेली आहे .रस्त्याच्या बाजूला सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम सुरू असून खुदाई एक फूट करण्यात आली असून त्यामध्ये दीड इंची बोर्डर , ४० एम एम गिट्टीचा वापर करण्यात येत नाही. यामध्ये सरळ मुरूम ऐवजी मातीचा वापर करण्यात येत आहे. रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू असून रस्त्याचे कोणतेही खोदकाम न करता सरळ त्यावर गिट्टी ,बारीक चूरीचा वापर करून डांबरीकरण करण्यात येत आहे .सदर रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट असून जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन सदर सुरू असलेल्या कामाची चौकशी करण्यात यावी अन्यथा येत्या आठ दिवसात चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा  सामाजिक कार्यकर्ते विनोद वंजारी व कुलदीप गंधे यांनी दैनिक तुफान क्रांतीचे जिल्हा प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याशी बोलताना व्यक्त केले .
Exit mobile version