Site icon Tufan Kranti

माझ्या मागे अनेक जणांचे पाठबळ असल्यामुळेच मी हे यश मिळू शकलो – मकरंद कोळी

मुरगूड प्रतिनिधी
इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी जे नेत्र दीपक यश मिळवले आहे त्यांच्या यशासाठी मी घेतलेली मेहनत आणि माझ्या मागे असलेले अनेक जणांचे पाठबळ यामुळेच अनेक परीक्षांमध्ये माझे विद्यार्थी यशस्वी झाले आहेत हे यश मी मिळू शकलो असे प्रतिपादन शिवाजी विद्यामंदिर चे शिक्षक मकरंद कोळी सर यांनी काढले ते शिवाजी विद्यामंदिर शाळा नंबर 2 मुरगुड तर्फे शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल मकरंद कोळी आणि त्यांच्या पत्नी अश्विनी कोळी यांचा पालकांतर्फे सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात  ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की माझ्या आयुष्यामध्ये मी अनेक स्वप्न पाहिली त्या स्वप्नांपैकीच एक म्हणजे विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणे हे होते माझ्या चौथीच्या विद्यार्थी बॅच चांगल्या पदापर्यंत जावी अशी माझी अपेक्षा आहे त्यासाठी मी त्यांच्या कायम सोबत राहील जोपर्यंत ते चांगल्या पदावर जात नाही तोपर्यंत मी त्यांची पाठ सोडणार नाही त्यांना माझं मार्गदर्शन नेहमीच राहील. कॉन्व्हेंट शाळांमध्ये चांगले शिक्षण मिळते अशी अनेकांची धारणा आहे पण मी माझ्या प्राथमिक शाळेतील मुले ही कोणत्याही कॉन्व्हेंट शाळेच्या विद्यार्थ्यांना केव्हाही चॅलेंज देऊ शकतील अशी मी त्यांची तयारी करून घेतली आहे असंही ते म्हणाले. यावेळी या सत्कार समारंभामध्ये शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग डॉक्टर जी.बी कळमकर यांनी मनोगत व्यक्त केले . यावेळी कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक संतोष कुमार वंडकर पाहुण्यांची ओळख सविता धबधबे कोळी सरांचा परिचय चंद्रकांत शिरोळे अध्यक्षीय मनोगत प्रवीण अंगज सूत्रसंचालन दशरथ सूतार तर आभार नंदिनी सारंग यांनी मानले यावेळी शाळेतील विद्यार्थी श्रीधन उमेश जोशी प्रसाद उमेश कुलकर्णी आराध्या सागर घाटगे यांनीही मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमास एस आर गावडे शिक्षण विस्तार अधिकारी कागल सारिका कासोटे गटशिक्षणाधिकारी कागल शामराव देसाई शिक्षण विस्तार अधिकारी कागल अनिल बोटे विजय मेंडके अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती एम आर गुरव शहाजी पाटील अमोल रणवरे संदिप सारंग विशाल इंदलकर विठ्ठल आमते अमर चौगुले रणजीत गुरव यांच्यासह विद्यार्थी . पालक आणि शिक्षक उपस्थित होते
Exit mobile version