Site icon Tufan Kranti

खा.निलेश लंकेंची इंग्रजीतून शपथ घेत सुजय विखेंवर कुरघोडी

गडब:
 सुरेश म्हात्रे, ,,,देशात तिसऱ्यांदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार स्थापन झालं असून नव्या १८ व्या लोकसभेचं अधिवेशनही चालू झालं आहे. अधिवेशनच्या पहिल्या दोन दिवसांत नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी पार पडला. यावेळी अनेक खासदारांनी त्यांच्या  मातृभाषे त शपथ घेतली. तर काहींनी इंग्रजीतून शपथ घेतली. ज्या उमेदवाराला इंग्रजी भाषेविषयी डिवचण्यात आलेलं त्याच उमेदवाराचा विजय झाल्यानंतर त्यांनी सभागृहात इंग्रजी भाषेतूनच शपथ घेतली. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या निलेश लंकेंच्या या कृतीमुळे त्यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर मतदारसंघात निलेश लंके यांनी भाजपा उमेदवार सुजय विखे यांचा २८ हजार मतांनी पराभव केला. ही निवडणूक देशभर चर्चेचा विषय बनली होती. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, माजी खासदार सुजय विखे यांनी निलेश लंके यांच्यावर शिक्षणावरून टीका केली होती. निलेश लंके यांनी माझ्यासारखं इंग्रजी बोलून दाखवल्यास मी निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेईन, असं विखे पाटील म्हणाले होते. त्यानंतर निवडणुकीच्या प्रचारकाळात निलेश लंके यांनी सुजय विखेंच्या टीकेला जशास तसं प्रत्युत्तर दिलं होतं.
Exit mobile version