Site icon Tufan Kranti

इंदापूर येथील कार्यकर्ते पाठींबा देण्यासाठी वडीगोद्री येथे दाखल!

दै. तुफान क्रांती/इंदापूर :
वडीगोद्री (जालना)येथे उपोषणस्थळी प्राध्यापक लक्ष्मण हाके सर व नवनाथ वाघमारे यांना पाठिंबा देण्यासाठी
आज इंदापूर येथून ओबीसी समाजातील कार्यकर्त्ये रवाना झाले.वडीगोद्री येथे जाऊन प्राध्यापक  लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांना त्यांनी पाठिंबा दिला, प्राद्यापक लक्ष्मण हाके यांची प्रकृती अतिशय खालावत चालली असून सरकारने त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली.
या वेळी अहिल्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष पांडूरंग मारकड तसेच तेजपृथ्वी ग्रूप तर्फे नानासाहेब खरात यांनी पाठिंब्याचे पत्र ही प्राध्यापक लक्ष्मण हाके यांना दिले.
  या वेळी त्यांचे समवेत इंदापूरचे सर्वश्री पांडूरंग तात्या मारकड, नानासाहेब खरात,माऊली वाघमोडे, रमेश आबा शिंदे, अशोक देवकर, गणेश घुगे,हनुमंत गोफणे व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
Exit mobile version