Site icon Tufan Kranti

इंदापूरात ऐन दुष्काळात हजारो लीटर पाणी वाया!

दैनिक तुफान क्रांती. 
इंदापूर:(दि. २८ मे)-
कॉन्ट्रॅक्टरचा हलगर्जीपणा व नगरपालिका प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष यामुळे इंदापुरात सातपुडा काजी गल्ली परिसरात पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटली.यातून हजारो लिटर पाणी वाया गेले.या ठिकाणी चालू असलेल्या रस्त्याच्या कामासाठी जेसीबीच्या साह्याने खोदकाम चालू होते. यावेळेस पिण्याची पाईपलाईन अनेक ठिकाणी फुटली.सदरहू पाईपलाईन दुरुस्त करण्यासाठी तथा कामावर देखरेख करण्यासाठी या  ठिकाणी कोणीही कर्मचारी तथा प्रशासकीय अधिकारी उपस्थित नव्हते. मुळात या परिसरात दोन दिवसानंतर पाणीपुरवठा केला जा तो अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.
अशा परिस्थितीत फुटलेल्या पाईपलाईन मधून नागरिकांना पाणी भरावे लागत होते. रस्त्याचे काम चालू असताना या ठिकाणी पाणीपुरवठा अधिकारी,नगरपालिकेचे इंजिनियर तथा कॉन्ट्रॅक्टर उपस्थित असणे आवश्यक होते.परंतु कोणीही याची दखल घेतली नाही.त्यामुळे दुष्काळात हजारो लिटर पाणी वाया गेले. त्याचप्रमाणे पाईपलाईन मधून दूषित  पाण्याचा पुरवठा पुढील भागात सुद्धा झाला.या दूषित पाण्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झालेला आहे.याबद्दल स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
Exit mobile version