सांगोला:
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख व डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्या यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कोळा येथील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वगृही गुरूवार दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी प्रवेश केला आहे. डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा झाला. यावेळी *कोळे येथील इराचीवाडी,दमडे वस्ती,गोडसे वस्ती येथील श्री दत्तात्रय सुखदेव सरगर, श्री नारायण सरगर, श्री सुखदेव सरगर, श्री समाधान सरगर, श्री अक्षय सरगर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत स्वगृही प्रवेश केला.यावेळी मा. पंचायत समिती सदस्य श्री सिताराम सरगर, उपसरपंच श्री बीरा सरगर, मा.सरपंच मारुती सरगर सर, सूतगिरणी संचालक श्री कुंडलिक आलदर सर, युवक नेते श्री श्रीमंत सरगर, श्री राजू शेठ माळी, श्री चेतनभाऊ रुपनर, मा. ग्रा. पं. सदस्य. श्री रमेश कोळेकर,श्री अशोक सरगर सर, श्री लिंगाप्पा सरगर, श्री तुळशीराम सरगर, श्री दशरथ सरगर, श्री शामराव सरगर, श्री सोपान सरगर, श्री शिवाजी पांढरे, श्री मच्छिंद्र गडदे, श्री लक्ष्मण सरगर, श्री नवनाथ सरगर, श्री पांडुरंग सरगर, श्री बाजीराव सरगर, श्री तानाजी सरगर उपस्थित होते. निष्ठावंत कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख व डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी डॉ बाबासाहेब देशमुख यांनी सर्वांचे स्वागत करून शेतकरी कामगार पक्षात आपणास योग्य तो मानसन्मान दिला जाईल असे आश्वासन देवून सर्वांचे स्वागत केले. विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना कोळा भागतून विक्रमी मताधिक्य देण्याचा निर्धार प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.