Site icon Tufan Kranti

बाबासाहेबांच्या रुपाने ..पुंन्हा लाल बावटा सांगोल्यात फडकणार, फक्त मनापासुन काम करुया

सांगोला :

शेतकरी कामगार पक्षाच्या व पुरोगामी युवक संघटनेच्या नेते ,पदाधिकारी व‌ कार्यकर्ते यांना नम्र विनंती…काही दिवसात विधानसभेची आचार संहिता लागु होईल..सध्या निवडणुकांचा माहोल तयार झालेला‌ आहे..कित्येक नेते आपल्या पक्षाच्या माध्यमातुन कामाला लागले आहेत तर काही नेते कुणाची तरी मते विभागण्यासाठी सुपारी घेऊन कामाला लागले आहेत याची कुणकुण सामांन्यापर्यंत‌ पोहचली आहे तरीही आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विशेषता तरुणांनी आशा‌ गोष्टी गांभिर्यपुर्वक लक्षात घेतल्या पाहिजेत.
आपल्या पक्षाचे नेते व पुरोगामी युवक संघटनेचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख हे स्व.आहेबांच्या पावलावर पाऊल टाकुन जनतेची सेवा करीत आहेत..सांगोला विधानसभा मतदार संघातील जनतेने सुध्दा त्यांच्या नेतृत्वावरती विश्वास व्यक्त केला आहे.डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख यांचे नेतृत्व सर्वमांन्य झाले आहे व संपुर्ण मतदार संघात त्यांना अभुतपुर्व प्रतिसाद सुध्दा मिळत आहे..त्यांचा जनसंपर्कही दांडगा आहे..म्हणजेच येणाऱ्या २०२४ च्या विधानसभेला शेतकरी कामगार पक्षाचे डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख हे महाविकास आघाडीचे उमेदवार असणार आहेत…आणी या गोष्टीची कल्पना विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही आली आहे डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख यांची उमेदवारी ही जनतेनी ठरवलेली उमेदवारी आहे‌‌..कारण शेकापक्षात केडरला महत्व आहे.शेकापच्या गावोगावच्या केडरने व हितचि़तकांनी बाबासाहेबांचे नेतृत्व स्विकारले आहे. बाबासाहेबांची निवडणुक जनता हातात घेणार आहे हे या सर्वांना माहित झाल्यामुळे काही लोक आतापासुनच शेकापक्षात संभ्रम निर्माण करताना दिसत आहेत ..जाणुन बुजुन वर्तमान पत्रात बाबासाहेबांचे नाव वगळणे..डाॅ.बाबासाहेब देशमुख यांच्या बाबत संभ्रम निर्माण करणे,,आपल्या पक्षातील कार्यकर्त्यामध्ये संभ्रमाचे वातावरण तयार करणे..व‌ आपल्या विरोधात बातम्या पेरणे आसे प्रकार पहायला मिळत आहेत व पुढेही पाहावयास मिळतील.आपण आशा प्रचाराकडे व चुकीच्या बातम्यांच्या माध्यमातुन कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्या बातमा व मेसेज ला सर्वांनी वस्तुस्थीतीला धरुन योग्य ते उत्तर देऊन संभ्रम दुर करण्याचे काम करावे कारण लोकांनी‌च आबासाहेबांचे वारसदार म्हणुन बाबासाहेबांना पस़ती दिली आहे. आपल्या सोबत जनता खंबीरपणे उभी आहे हे लक्षात ठेवुन काम करायचे आहे‌.
शेतकरी कामगार पक्षाच्या व पुरोगामी युवक संघटनेच्या सर्व नेते,पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज..आत्तापासुनच कामाला लागुया..व सांगोला‌ विधानसभा मतदार संघावर डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख यांच्या रुपाने पुंन्हा लाल‌ बावटा फडकवण्यासाठी‌‌ आपण सर्वजण प्रयत्नांची पराकाष्ठा करुया.. …लाल.सलाम
आपलाच
-भाई चंद्रकांत सरतापे
प्रसिध्दी प्रमुख शेकाप

Exit mobile version