Site icon Tufan Kranti

भरतशेठ शहा यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा होणार !

दै.तुफान क्रांती/इंदापूर:
इंदापूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरतशेठ शहा यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर शहरात खेळ पैठणीचा होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दिनांक १० डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता शहा सांस्कृतिक भवन इंदापूर येथे सिने अभिनेते संकर्षण कर्हाडे यांच्या उपस्थितीत होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
इंदापूर शहर व परिसरात सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक कार्यात शहा कुटुंबीयांचे मोठे योगदान आहे. इंदापूर शहरात व परिसरात भरतशेठ शहा व शहा कुटुंब यांना मानणारा मोठा वर्ग आहे. भरतशेठ शहा यांच्या वाढदिवसानिमित्त मित्र परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सहभागी विजेत्या महिलांना आकर्षक भेटवस्तू व पारितोषिके देण्यात येणार आहेत. होम मिनिस्टर या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
तसेच फेडरेशन ऑफ बॉडी बिल्डिंग अँड फिजिक स्पोर्ट्स, पुणे. यांच्या मान्यतेने व पुणे जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटना यांच्या सहकार्याने श्री. भरतशेठ शहा यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा २०२४ इंदापूर श्री ९ डिसेंबर २०२४ रोजी सायं. ६ वा. शहा सांस्कृतिक भवन, इंदापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या आहेत.इंदापूर श्री विजेत्यास रु.१५०००/- रोख व चषक ७० किलो वजनीगट खालील विजेत्यास ७०००/- रोख व चषक बेस्ट पोजर ३०००/- रोख व चषक मोस्ट इम्प्रुव्ह विजेत्यास ३०००/- रोख व चषक देण्यात येणार आहे.
वजन गट- ५५,६०,६५,७०,७५,८० व ८० किलो वरील खुला गट प्रत्येक गटातील १ ते ५ विजयी स्पर्धकांना अनुक्रमे रुपये ५०००/-, ४०००/-, ३०००/-, २०००/-, १०००/- रोख रक्कम, मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक देण्यात येईल.
या कार्यक्रमाचे स्थळ शहा सांस्कृतिक भवन, इंदापूर, जि. पुणे हे असून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे तसेच दहा तारखेला होणाऱ्या होमनिस्टर खेळपैठणीचा या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक मा. श्री. भरतभाऊ शहा मित्र परिवार यांचे वतीने करण्यात आले आहे.

Exit mobile version