Site icon Tufan Kranti

उदनवाडी कारंडेवाडी येथील शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांचा शेकाप मध्ये जाहीर प्रवेश

सांगोला:
शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ.बाबासाहेब देशमुख व डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेच्या विद्यमान नेतृत्वाला कंटाळून कट्टर शहाजीबापू समर्थकांनी डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत शेकाप मध्ये प्रवेश केला.विधानसभा निवडणुकीत डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना कोणत्याही परिस्थितीत आमदार करायचे या ईर्षेने पेटलेल्या उदनवाडी कारंडेवाडी गावातील कट्टर शहाजीबापू गटाच्या समर्थकांनी पक्षाला रामराम करीत एकदिलाने शेकाप मध्ये प्रवेश केला.
2019 ला मा.शहाजीबापु पाटील‌ यांच्या सोबत असलेले उदनवाडी कारंडेवाडी गावचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शिवसेना शिंदे गटातुन सोमवार दि. ४ नोव्हेंबर रोजी डॉ.भाई बाबासाहेब‌ देशमुख यांच्या उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला.
यावेळी जेष्ठ नेते बापू सदाशिव चौगुले,दत्तात्रय बंदवडे,जयवंत ठोंबरे,वसंत चौगुले,विठोबा चौगुले,अशोक शेळके,प्रभू शेळके,तुकाराम मारकड,संतोष ठोंबरे,तानाजी सरगर,मल्लिकार्जुन शेळके,सुभाष गडदे,शंकर चौगुले,मधुकर मारकड,गणेश शेळके,हरिभाऊ शेळके,रावसाहेब चौगुले,दिनेश शेळके हे उपस्थित होते.
सांगोला तालुक्यातील उदनवाडी कारंडेवाडी येथील शिवसेना पक्षामधील अंतर्गत राजकारणाला कंटाळून निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पक्षाला अखेरचा निरोप देत डॉक्टर बाबासाहेब देशमुख व डॉ. अनिकेत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी शेकाप मध्ये प्रवेश केला.
आगामी निवडणुकीला ध्यानात ठेवून प्रस्थापित नेत्यांकडून समाजासमाजात भांडणं लावण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे हे सर्वसामान्य जनतेला दिसतंय. शेतकरी कामगार पक्षाकडून आजपर्यंत असे घाणेरडे राजकारण कधीच केले नाही. शेकाप विरोधी नेतृत्व जेव्हाही सांगोला तालुक्यात बनते, तेव्हा या नेतृत्वाकडून समाजात फूट पाडणे किंवा भांडणे लावणे हा प्रकार झाला आहे. सत्तेशिवाय ही लोक राहू शकत नाही. संगोल्याची प्रतिमा मलिन करणे. जनतेत भ्रम निर्माण करणे हे काम सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे.त्याच प्रमाणे सर्वसामान्य जनतेवर अन्याय वाढल्या मुळे तसेच सर्वसामान्य जनतेमधून शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या बद्दल मोठी सहानुभूती दिसून येत असल्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत देखील शेतकरी कामगार पक्षाचा दणदणीत विजय होणार असल्यामुळे आम्ही शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला असल्याचे प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.

Exit mobile version