Site icon Tufan Kranti

शिवशंभू संघटनेचा आदर्श पत्रकार राज्यस्तरीय पुरस्कार सतीश भाऊ सावंत यांना जाहीर 

७ मार्चला होणार वितरण
 सांगोला /प्रतिनिधी:
 शिवशंभू संघटना  महाराष्ट्र राज्य   या संघटनेच्या किल्ले तोरणा हिंदवी स्वराज्याचे तोरण  उत्सवानिमित्त प्रत्येक वर्षी दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष, अभ्यासू निर्भीड व धाडसी पत्रकार सतीश भाऊ सावंत यांना जाहीर झाला आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याची काम त्यांनी सातत्याने केले आहे. सतीश भाऊ सावंत दोन दैनिके असून त्यांनी अनेक नवोदित पत्रकार तयार केले आहेत निर्भीड पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. सांगोला शहरातील जनतेचे अहोरात्र प्रश्न सोडवण्यासाठी ते कायम कटिबद्ध असतात.
त्यांनी त्यांच्या लेखणीतून हजारो गोरगरीब सर्वसामान्य वंचित घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना महाराष्ट्रातून अनेक पुरस्कार मिळाले आहेत. जनतेचे प्रश्न निर्भीडपणे मांडून अधिकाऱ्यांवरचा वचक कायम राखला आहे. शिवशंभू संघटना  महाराष्ट्र राज्य   या संघटनेच्या किल्ले तोरणा हिंदवी स्वराज्याचे तोरण  उत्सवानिमित्त प्रत्येक वर्षी दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष,  पत्रकार सतीश भाऊ सावंत यांना जाहीर झाला असून राज्यातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीझाला असून राज्यातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत ७ मार्च रोजी या पुरस्काराची वितरण होणार आहे.
Exit mobile version