Site icon Tufan Kranti

पैसेवाल्याचा नाही तर चांगलेकाम करणाऱ्यांचा इतिहास लिहिला जातो- सपोनी संकेत दिघे

पैसेवाल्याचा नाही तर चांगलेकाम करणाऱ्यांचा इतिहास लिहिला जातो- सपोनी संकेत दिघे
नांदेड जिल्हा प्रतिनिधि .
धम्मानंद भेदेकर चिटमोगरा 
        माणसाने आपल्या जीवनात कितीही पैसे कमवले तरी त्या पैसेवाल्या माणसाचा कधीच इतिहास लिहिला जाऊ शकत नाही परंतु मनोज जरांगे पाटलासारख्या सामान्य माणसांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जे काम केले असी चांगली काम करणाऱ्या माणसाचा इतिहास लिहिला जाऊ शकतो यासाठी पैशापेक्षाही अधिक महत्त्व आपल्या कामाला दिलं पाहिजे असे मत रामतीर्थ पोलीस स्टेशनचे सपोनी संकेत दिघे यांनी व्यक्त केले.
       रामतीर्थ पोलीस स्टेशन येथील सपोनी संकेत दिघे यांची येथून बदली झाल्याने त्यांना निरोप निरोप आणी याच पोलीस स्टेशनला नव्याने रुजू झालेले सपोनि जगताप यांचे स्वागत असा रामतीर्थ पोलीस स्टेशन कर्मचाऱ्यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर भास्करराव पाटील पब्लिक स्कूलचे प्राचार्य दुर्गाप्रसाद पांडे, शिवसेना तालुकाप्रमुख रवींद्र पाटील भिलवंडे, मागासवर्गीय काँग्रेस सेलचे तालुका अध्यक्ष माधव वाघमारे, नरसी येथील पोलीस पाटील इब्राहिम बेग आधी सह अन्य मान्यवर मंडळी व्यासपीठावर उपस्थित होते.
     या निरोप व स्वागत समारंभ कार्यक्रमाच्या प्रसंगी अनेक मान्यवर मंडळींनी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त करताना कमी कालावधीत संकेत दिघे यांनी अतिशय सुंदर व चांगले काम केले असा त्यांचा गौरव करून त्यांच्या पुढील कारकीर्दीस शुभेच्छा दिले.यावेळी संकेत दिघे यांनी पुढे बोलताना म्हणाली की माणसाने कोणतेही काम करताना त्या कामाची कसलीही लाज न बाळगता आपण ते काम मनापासून केले तर आपले कधीच वाईट होऊ शकत नाही परंतु आपण आपले काम  प्रामाणिकपणे न करता कामात कुचराई केली तर आपल्यावर वाईट दिवस ऐन्यास जास्त वेळ लागत नाही असे सांगून सर्व पोलीस कर्मचारी, परिसरातील नागरिक, पत्रकार मित्र आणि पोलिसांच्या वर्दी व्यतिरिक्त पोलीस म्हणून जनतेने सहकार्य केले अशा सर्वांचे आभार व्यक्त केले.
      रामतीर्थ पोलीस स्टेशन येथे नव्याने रुजू झालेले सपोनी जगताप यांनी कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करीन असे सांगितले.या प्रसंगी सपोनी संकेत दिघे व सपोनी जगताप यांचा रामतीर्थ पोलीस स्टेशनचे कर्मचारी व  हद्दीतील पोलीस पाटील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, सरपंच व नागरिक यांच्या वतीने स्वागत करण्यात आले.
     या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जांभळीकर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रामतीर्थ पोलीस स्टेशनच्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
Exit mobile version