मिरज प्रांत आधिकार्यांना केतकी चितळेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणेबाबतचे निवेदन सादर
शुक्रवार दि. १ मार्च २०२४ रोजी रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया(आठवले) सांगली शहर जिल्हा व युवक आघाडीचे वतीने, सांगली शहर जिल्हाध्यक्ष मा. पोपटभाऊ कांबळे, युवक सांगली जिल्हाध्यक्ष मा. श्वेतभैया कांबळे व महिला जिल्हाध्यक्षा मा. छायादिदी सर्वदे यांचे अध्यक्षतेखाली अभिनेत्री केतकी चितळे नामक महिलेने ॲक्ट्रोसिटी कायद्या बाबत केलेल्या विधाना विरोधात तिव्र जोडे-मारो आंदोलन करून व मिरज प्रांत अधिकार्यांना निवेदन देऊन निषेध करणेत आला.
यावेळी रिपब्लिकन(आठवले) पक्षाचे सांगली जिल्हा सरचिटनीस मा. मिलिंद मेटकरी, आय.टी.सेलचे सांगली जिल्हाध्यक्ष मा. योगेंद्र कांबळे, मिरज तालुकाध्यक्ष मा. अरविंद कांबळे, मा. युवक मिरज तालुकाध्यक्ष मा. नंदकुमार कांबळे, कुपवाड शहर अध्यक्ष मा. संतोष सर्वदे, युवक मिरज शहर अध्यक्ष मा. विक्रांत वाघमारे, कुपवाड शहर उपाध्यक्ष मा. प्रमोद कांबळे, मिरज शहर उपाध्यक्ष मा. सचिन सकटे, युवक मिरज शहर कार्याध्यक्ष मा. शुभम वाघमारे, मिरज शहर उपाध्यक्ष मा. तानाजी चव्हाण, युवक मिरज शहर उपाध्यक्ष मा. पवण कांबळे, कुपवाड शहर सह सचिव मा. साबीर मुल्ला, युवक मिरज शहर संघटन सचिव मा. अभिनव कांबळे, युवक मिरज तालुका उपाध्यक्ष मा. रसिक जकाते, युवक मिरज शहर उपाध्यक्ष मा. इम्रान बेपारी, युवक मिरज शहर सह. सचिव मा. तेजस कांबळे, मा. सुमित कांबळे, मा. अतिश राऊत, मा. राजू बनसोडे, मा. प्रशिक कांबळे, मा. मिथुन कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी प्रथम मिरज शहरातील श्रीकांत चौक येथे अभिनेत्री केतकी चितळेच्या प्रतिकात्मक फोटोस जोडे मारून व घोषणाबाजी करून तिव्र शब्दात निषेध करणेत आला व मिरज प्रांतचे प्रांतअधिकारी मा. उत्तम दिघे यांना निवेदन देऊन सदर अभिनेत्रीवर भारतीय दंड संहिते प्रमाणे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणेची मागणी करणेत आली.
यावेळी प्रसारमाध्यमांसी बोलताना सांगली शहर जिल्हाध्यक्ष मा. पोपटभाऊ कांबळे म्हणाले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेल भारतीय संविधाना प्रमाणे सर्वांना आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. परंतू समंधीत अभिनेत्रीने संविधानातील ॲक्ट्रोसीटी कायद्याबाबत संभ्रम आवस्था निर्माण करणार विधान करून समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण करणेच कार्य करत आहे. हे रिपब्लिकन पक्ष कद्यपी सहन करणार नाही. प्रशासनाने या घटनेची दखल घेऊन केतकी चितळे या अभिनेत्रीवर गुन्हा दाखल करून कार्यवाही करावी. यावेळी महिला जिल्हाध्यक्षा मा. छायाददिदी सर्वदे म्हणाल्या, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेल्या भारतीय संविधानामध्ये पुरूष व महिलांना समान अधिकार दिलेले आहेत. याच कलमाप्रमाणे आज केतकी चितळे अभिनेत्री म्हणून वावरत आहे तरी तीने प्रसिद्धि मिळवण्याकरीता ॲक्ट्रोसिटी बाबत केलेल विधान हे चुकीच असून रिपब्लिकन(आठवले) महिला आघाडी कद्यपी सहन करणार नाही. सदरची अभिनेत्री ही विवीध प्रसारमाध्यमांद्वारे वादग्रस्थ विधान करण्याबाबतीत कुप्रसिद्ध असून तीचा प्रशासनाने वेळीच बंदोबस्त करावा अन्यथा रिपब्लिकन(आठवले) महिला आघाडीचे वतीने तिव्र आंदोलन छेडणेत येईल.
यावेळी युवक सांगली जिल्हाध्यक्ष मा. श्वेतभैया कांबळे म्हणाले, बीड तालुका परळी येथे काही दिवसांपूर्वी ब्राम्हण ऐक्य परिषदेचे आयोजन करणेत आले होते. सदरच्या कार्यक्रमामध्ये केतकी चितळे या मनोरूग्ण अभिनेत्रीने ॲक्ट्रोसिटी कायद्याबाबत संभ्रम आवस्था निर्माण करणारे विधान केले प्रथमतः या घटनेचा आम्ही रिपब्लिकन पक्षाचे वतीने तिव्र निषेध करीत आहोत. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक चळवळीमध्ये कमलाकांत चित्रे, गंगाधर सहस्रबुद्धे, अनंत चित्रे, कृष्णाजी तळवटकर सारखे ब्राम्हण समाजाचे प्रतिनिधीत्व करणारे कार्यकर्ते कार्यरत होते. शिव फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये केतकी चितळेच्या ॲक्ट्रोसिटी बाबत केलेल्या बेताल वक्तव्यामुळे बहूजन समाज संतप्त झाला आहे. केतकी चितळे प्रसिद्धि मिळवण्यासाठी असे बेताल वक्तव्य करण्यासाठी कुप्रसिद्ध असून अशी सामाजिक भावना दुखवणारी विधाने करून जेलची हवा देखील खाल्ली आहे. तरी केतकी चितळेने मिरज शहरातील सुप्रसिद्ध मनोचिकीत्सालय कृपामाई येथे येऊन स्वतःच्यावर उपचार करून घ्यावेत व त्यासाठी होणारा खर्च हा आम्ही स्वतः करू.