Site icon Tufan Kranti

माजी खासदार राम नाईक यांना भारत सरकार कडून ” पद्मभूषण” जाहीर.

माजी खासदार राम नाईक यांना भारत सरकार कडून " पद्मभूषण" जाहीर.
भारत कवितके मुंबई कांदिवली.
उत्तर मुंबई चे माजी खासदार, माजी पेट्रोलियममंत्री, माजी रेल्वेमंत्री, माजी उत्तर प्रदेश चे राज्यपाल राम नाईक यांना भारत सरकार कडून पद्मभूषण जाहीर करण्यात आला आहे.मूळचे आटपाडी गावचे असलेले राम नाईक हे १९७८ साली प्रथम आमदार झाले.तेव्हा घरातच त्यांनी कार्यालय चालू केले होते.नुसत्या घोषणा व आश्वासने न देता त्यांचे राजकीय कार्य हे कृतीशील, क्रियाशील होते.४५ वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी आमदार, खासदार, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री, केंद्रीय रेल्वेमंत्री, राज्यपाल वगैरे वगैरे पदावर प्रामाणिक पणे व चोखपणे कार्य केले.बंब ई,बाम्बेचे मुंबई करण्यासाठी ही त्यांना संघर्ष करावा लागला.फैजाबाद चे अयोध्या, अलाहाबाद चे प्रयागराज हे उत्तर प्रदेश चे राज्यपाल असताना राम नाईक यांच्या एका स्वाक्षरी ने झाले.२४ नोव्हेंबर १९९२ रोजी संसदेत अधिवेशनाची सुरुवात जन गण मन यांनी केली,तर २३ डिसेंबर १९९२ रोजी संसदेत अधिवेशनाचा समारोप वंदेमातरम ने करण्याची परंपरा राम नाईक यांनी केली.आमचे प्रतिनिधी भारत कवितके यांनी राम नाईक यांचेशी बातचीत करताना राम नाईक यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीतील अनेक प्रसंग कथन केले.दिंडोशी, गोकुळ धाम येथील त्यांच्या निवासस्थानी समाजाच्या अनेक थरांतून अभिनंदन व शुभेच्छा देण्यासाठी गर्दी झालेली निदर्शनास येते.
Exit mobile version