Site icon Tufan Kranti

पंढरपूर सिंहगडचे वैभव नकाते यांची ब्रँच पोस्ट मास्तर पदी निवड

पंढरपूर सिंहगडचे वैभव नकाते यांची ब्रँच पोस्ट मास्तर पदी निवड
पंढरपूर: प्रतिनिधी 
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात शिक्षण पुर्ण केलेले अनगर (ता. मोहोळ) येथील वैभव किसन अनगर यांची ब्रँच पोस्ट मास्तर पदी निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
   भारतीय टपाल विभागाअंतर्गत विविध जागांसाठी ३९ हजार  पदांची भरती प्रकिया नुकतीच पार पडली असुन हि भरती प्रक्रिया १० वी च्या गुणवत्तेवर आधारीत करण्यात आली होती.
 यासाठी महाराष्ट्र राज्यभरातून जवळपास १० लाख तर सबंध भारतातुन ४० लाखांपेक्षा जास्त अर्ज आले होते. यामधुन १० वी च्या गुणवत्तेवर आधारीत भरती प्रक्रिया पुर्ण करण्यात आली असुन यामध्ये पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये शिक्षण घेतलेले वैभव किसन नकाते यांची सांगली विभागातील कडेगाव तालुक्यातील शिवणी पोस्ट कार्यालयात ब्रँच पोस्ट मास्तर म्हणून निवड झाली आहे.
    पोस्ट कार्यालयात ब्रँच पोस्ट मास्तर म्हणून निवड झाल्याबद्दल प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. चेतन पिसे, डाॅ. समीर कटेकर, डाॅ. संपत देशमुख, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. अतुल आराध्ये, डॉ. भालचंद्र गोडबोले, डॉ. सुभाष पिंगळे, डाॅ. सोमनाथ कोळी, डाॅ. शिरीष कुलकर्णी, प्रा. अनिल निकम आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
Exit mobile version