सांगोला:
निरू भैय्या युथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री. निरंजन बळीराम गडहिरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग सांगोला यांना जुना सांगोला मेडशिंगी रस्त्यालगत दुतर्फि काटेरी झुडपे वाढली असल्यामुळे वाहन चालकास समोरून येणारी वाहने दिसत नाहीत व काटेरी झुडपे साईड पट्ट्यावर आल्याने रस्ता अपुरा पडत आहे काही ठिकाणी साईड पट्ट्या नामशेष झाल्या असल्याने नागरिकांच्या जीवास धोका होत आहे,त्याबरोबर मेडशिंगी आलेगाव रस्त्याशेजारी धोकादायक विहरीला लवकरात लवकर संरक्षण कठडा बांधून तिथे दर्शनी फलक लावून नागरिकांचा प्रवास सुखकर करावा यासाठी निरू भैय्या युथ फाऊंडेशन यांचे तर्फे निवेदन देण्यात आले ,त्यावेळी उपस्थित संस्थेचे अध्यक्ष निरु भैय्या गडहिरे, सुशांत गडदे,शुभम शिंदे, आशिष माने , साई कसबे हे होते. तरी संबंधित विभागाने दोन्ही विषय लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.