Site icon Tufan Kranti

मोहसीन ए मिल्लत कमेटीच्या पाथर्डी तालुकाध्यक्षपदी वजीर शेख

  पाथर्डी:
पाथर्डी तालुक्यातील पाडळी येथील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते वजीरभाई शेख यांची मोहसिन ए मिल्लत कमेटीच्या पाथर्डी तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे मोहसिन ए मिल्लत कमेटीचे ॲड.मोहसिन एस.शेख यांनी यांनी सांगितले,
श्रीरामपूर येथील मोहसिन ए मिल्लत कार्यालयात झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात समता फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष शौकतभाई शेख यांच्या हस्ते वजीरभाई शेख यांना नियुक्तीपत्र बहाल करण्यात आले. यावेळी मोहसिन ए मिल्लत कमेटी चे ऍड.मोहसिन शेख,अफजल मेमन,सरताज शेख,जावेद शेख आदि उपस्थित होते. मोहसीन ए मिल्लत कमेटी ही समाजातील उपेक्षित आणी दुर्लक्षितांच्या ज्वलंत प्रश्नांसोबत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने कार्यरत असून याबरोबरच त्यांच्या विविध आवश्यक कामांना शासन दरबारी उचीत न्याय मिळवून देणेकामी प्रयत्नशील असते.
वजीरभाई शेख यांचे पत्रकारितेसह सामाजिक क्षेत्रात मोठे कार्य असल्याने सामाजातील उपेक्षित घटकांना मोठा फायदा मिळू शकेल या उद्देशाने त्यांची निवड केली असल्याचे ऍड. मोहसिन शेख यावेळी म्हणाले.वजीरभाई शेख यांच्या या निवडीबद्दल समता फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शौकतभाई शेख, समता ऑनलाईन सर्व्हिसेस चे सरताज शेख,निजामभाई पटेल (शेवगांव),  जावेद सय्यद (आष्टी), नसीर शेख, हुमायुनभाई अत्तार (पाथर्डी),  आदींनी अभिनंदन केले आहे.
Exit mobile version