Site icon Tufan Kranti

ग्राम मारोड येथिल शाळेला कायमस्वरूपी शिक्षक द्या, मागणीसाठी विद्यार्थ्यांनी शिक्षणाधिकारी कार्यालयात भरवली शाळा

मारोड:
 ग्राम मारोड ता. संग्रामपूर येथे इयत्ता १ ते ४ पर्यत शाळा आहे. गेल्या चार वर्षांपासून येथे कायम स्वरुपी शिक्षक नसल्याने संग्रामपूर पंचायत समिती कार्यालयाच्या तालुका शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करीत विध्यार्थी व पालक यांनी चांगलीच शाळा भरविली.
       जळगाव जामोद मतदारसंघातील अनेक शाळांमधील शिक्षकांची पदे रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचा मूलभूत शिक्षणाचा अधिकार हिरावल्या जात आहे. राजकीय नेते मात्र जणतेला वाऱ्यावर सोडून स्वतःचे उद्योग व ठेकेदारी करण्यात मग्न आहेत. या आंदोलनात स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी सहभागी होत जो पर्यंत विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटणार नाही तो पर्यंत आंदोलन थांबणार नाही अशी भूमिका घेतल्यानतंर प्रशासन चांगलेच हादरले होते, अखेर बुलढाणा जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी प्रशांत डिक्कर यांचेशी भ्रमणध्वनीवर संपर्क करुण दोन दिवसात दोन शिक्षक शाळेवर रुजू करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच तालुका शिक्षण अधिकारी भिसे यांनी त्याबाबत आंदोलकांना पत्र देऊन आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. यावेळी स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर, कॉग्रेसच्या स्वाती वाकेकर, स्वाभिमानीचे नेते तथा सरपंच अजय ठाकरे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माने, यांचेसह विद्यार्थी ,पालक व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
Exit mobile version