दिपकआबांचा एक कॉल आणि वारकऱ्यांचा प्रॉब्लेम सॉलव्ह…!
सांगोला :
किल्ले मच्छिंद्रगड येथून पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या मच्छिंद्रनाथाच्या पालखीला आडवे येणारे रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले काटेरी चिलार अखेर प्रशासनाने काढले आहे. नुकतेच गावभेट दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिल्या होत्या.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांचा सांगोला तालुक्यात गावभेट दौरा सुरू आहे. आबांचा गावभेट दौरा लोटेवाडी ता. सांगोला येथे आला असता येथील सातारकरवस्ती वरील नागरिकांनी आषाढी एकादशी निमित्त किल्ले मच्छिंद्रगड येथून श्री मच्छिंद्रनाथांची पालखी पंढरपूरला लोटेवाडी ते अचकदानी मार्गे जाते. परंतु, या रस्त्याच्या दुतर्फा काटेरी चिलार वाढले असल्याचे दिपकआबांना सांगितले होते. रस्त्याच्या दुतर्फा काटेरी चिलार प्रचंड वाढल्याने या रस्त्यावरून सामान्य नागरिक महिला आणि विद्यार्थ्यांना अनंत अडचणी येत होत्या. त्यामुळे पालखीसोबत असणाऱ्या वारकऱ्यांना आणि श्री मच्छिंद्रनाथाच्या पालखीला या रस्त्यावरून जाणे अवघड असल्याची बाब लोटेवाडी येथील ग्रामस्थांनी माजी आमदार दिपकआबांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी आबांनीही तात्काळ ग्रामस्थांच्या समोरच सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन तात्काळ रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले चिलार काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. संबंधित प्रशासनानेही लगेचच कार्यवाही सुरू करत कौठूळी पूल येथून जुनी लोटेवाडी, नवीन लोटेवाडी, सातारकरवस्ती ते अचकदानी तसेच श्री मच्छिंद्रनाथ पालखीच्या वाटेवर रस्त्याच्या दुतर्फा असलेली काटेरी चिलार तसेच अन्य काटेरी वनस्पती काढून पालखीला मार्ग मोकळा करून दिला.
माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील हे गावभेट दौऱ्यावर आले असता आम्ही लोटेवाडी ग्रामस्थांनी लोटेवाडी ते अचकदाणी दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली चिलार काढण्याची विनंती केली होती. आबांनीही आपल्या खास शैलीत लगेचच सबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिल्या. आबांच्या सुचनेनंतर दुसऱ्याच दिवशी पहाटे ३ पासून रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली काटेरी चिलार काढण्याचे काम सुरू झाले आणि जगद्गुरु श्री मच्छिंद्रनाथाची पालखी आणि सोबत असलेल्या वारकऱ्यांना या रस्त्यावरून सुखरूप प्रवास करता आला आणि अचकदानी येथे श्री मच्छिंद्रनाथाच्या पालखीचा रिंगण सोहळा पार पडला.
-विजय खांडेकर,
मा. सरपंच, लोटेवाडी