Site icon Tufan Kranti

भाग क्रमांक १६६ च्या पोलिंग चिठ्ठी न मिळाल्यामुळे इंदिरा नगर परिसरातील अनेक मतदार मतदानापासून वंचित

 प्रशासनाकडून हलगर्जीपणा ; बीएलओ यांच्यावर कारवाई करण्याची मागणी
 मंठा/प्रतिनिधी:
 परभणी लोकसभा मतदार संघाच्या २०२४च्या निवडणुकीसाठी शुक्रवार ता.२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. पोलिंग चिठ्ठी न मिळाल्यामुळे मंठा शहरातील अनेक मतदारांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही.बीएलओ यांचा निष्काळजीपणा आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे मतदारांना मानसिक त्रास सहन करावा लागला.परभणी लोकसभा मतदारसंघासाठी मंठा शहरात मतदार केंद्र निर्माण करण्यात आले प्रत्येक बीएलओ यांच्यावर मतदारांपर्यंत पोल चिठ्ठी पोहोचविण्याची जबाबदारी प्रशासनाने दिली होती. मात्र शहरातील भाग क्रमांक १४९, १५०, १५३, १५४, १५८, १६१,१६४ बुथवरील मतदारांना काही प्रमाणात पोल चिठ्ठी देण्यात आली असली तरीही इतर भाग क्रमांक असलेल्या मतदारांना मात्र पोल चिठ्ठी न मिळाल्यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागला. अनेक मतदारांची मतदान केंद्र शोधताना दमछाक झाल्याचे दिसून आले.
यासंदर्भात भाग क्रमांक १६६ यादी मध्ये नाव असलेल्या मतदारांनी आपली कैफियत तहसील कार्यालयात नायब तहसीलदार शिंदे साहेब यांना निवेदन देऊन केली.आता तहसीलदार मॅडम बीएलओ वर कारवाही करणार का याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. निवेदनावर मतदार मोहसीन इसा कुरेशी सह भाग क्रमांक १६६ मतदारांचे स्वाक्षऱ्या होते.
Exit mobile version