Site icon Tufan Kranti

दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीतील चोर जेरबंद

दौंड:

कानगाव येथिल पाटस स्टेशन परिसरात शनिवार(४ऑक्टोबर )रोजी रात्रीच्या वेळी दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीचा नागरिकांच्या सतर्कतेमुळे प्रयन्त फसला, असून यवत पोलीसांनी दोन चोरांना अटक केली असून त्यांची नावे सिध्दु रसिकलाल चव्हाण वय १९ वर्षे व बाबुशा गुलाब काळे रा. शेडगाव ता – श्रीगोंदा, जि – अहमदनगर अशी आहेत.
कानगाव गावच्या हद्दीतील पाटस स्टेशन परिसरात रात्रीच्या साडेनऊ वाजण्याच्या आसपास दोन मोटार सायकल घेऊन मारक हत्यारे जवळ बाळगून पाच इसम झाडाझुडपात लपून बसल्याचा नागरिकांना संशय आल्याने नागरिकांनी पोलीसांना कळवले असता पाटस पोलीसांनी तात्काळ घटनास्थाळी धाव घेऊन नागरिकांच्या मदतीने एका चोरास पकडले असून बाकीच्यांनी झाडाझुडपांचा फायदा घेत पळ काढला.पोलीस हवालदार कानिफनाथ पानसरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख करीत आहेत.

Exit mobile version