Site icon Tufan Kranti

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बिग बॉस मराठी ५ चा विजेता सुरज चव्हाणशी साधला संवाद, अजित पवार यांच्याकडून सुरजाला घर देण्याचे आश्वासन

‘बिग बॉस मराठी ५’चा विजेता सूरज चव्हाण याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यातील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांच्या कामगिरीचे कौतुक करताना सांगितले की, त्यांच्या मोकळ्या मनाच्या स्वभावामुळे त्यांना बिग बॉसची ट्रॉफी जिंकण्यास मदत झाली. यावेळी अजित पवार व त्यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी सुरज चव्हाण यांचा सत्कार करून घर देण्यासह सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले. अनेकदा फसवल्या गेल्यामुळे “सुरज चव्हाण यांना भविष्यात त्यांच्या कोणीही गैरफायदा घेऊ नये यासाठी विश्वासार्ह व्यक्ती मिळेल, त्यांना आवश्यक ती सर्व मदत मी करीन”अशी खात्री यावेळी अजित पवार यांनी दिली.

Exit mobile version