Site icon Tufan Kranti

15 ऑगस्ट 20 24 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे दुय्यम निबंधक अधिकारी सांगोला यांच्या विरोधात उपोषण

सांगोला:
सांगोला येथे संबंधित अधिकारी हजर झाल्यापासून तालुका व शहरवासीयांचे आपली जमीन मालमत्ता सांभाळ करणे गरजेचे झाले आहे. सांगोला कार्यालय येथे बेकायदेशीर व्यवहार वेळोवेळी होत असतानाचे दिसून येत आहे त्यामध्ये अनेकांच्या जमिनी मालक विनापरवाना विना मोबदला हस्तांतरित होत असल्याचे दिसत आहे व त्याचे दस्त संबंधित अधिकारी अमलात आणत असून विक्री करणारा व्यक्ती हा मूळ मालक आहे का याची कसलीही शहानिशा न करता केवळ आर्थिक हव्यासाने आर्थिक लोभाने ही दस्त खरेदी विक्री प्रक्रिया पार पडत असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर कार्यालय कर्मचारी म्हणून चार व्यक्ती व अधिकारी एक अशी नियुक्ती असताना इतर झिरो कर्मचारी यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी सजग राहून वेळोवेळी आपल्या जमीन मालमत्तेची सातबारा तपासणे गरजेचे झाले आहे. अशा बोगस कर्मचाऱ्यांची संबंधित कार्यालयातून हकालपट्टी व्हावी यासंबंधी यापूर्वी ही तक्रार देण्यात आली आहे.

त्यामुळे अशा केलेल्या बेकायदेशीर व बोगस दस्त नोंदणीची निष्पक्षपणे चौकशी होऊन संबंधित अधिकारी याच्यावर गुन्हा दाखल करून निलंबित करावे व त्या कार्यकाळातील झालेल्या दस्तांची सखोल चौकशी व्हावी अशा महत्त्वाच्या कार्यालयामध्ये असणारा झिरो चा वापर बंद व्हावा त्यांच्या हकालपट्टी करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन तक्रार दैनिक तुफान क्रांतीचे संपादक मिर्झागालिब मुजावर यांनी झालेल्या बोगस व बेकायदेशीर दस्तानच्या पुराव्यासह लेखी तक्रार वरिष्ठाना दिली असून त्यावर कारवाई न झाल्यास 15 ऑगस्ट 20 24 रोजी जिल्हाधिकार्यालय समोर उपोषण करणार असल्याचे म्हटले आहे, या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाई होते की त्यावर पांघरून घातले जाते याकडे सर्वनासामान्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Exit mobile version