Site icon Tufan Kranti

वंचित बहुजन आघाडीची गाव तिथे शाखा स्थापन करणार – विनोद (भैय्या) उबाळे

सांगोला येथे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

महूद/ प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडी सांगोला तालुका कार्यकारिणीची बैठक आज दि. 25 रोजी वंचित बहुजन आघाडीचे सांगोला तालुका अध्यक्ष विनोद भैय्या उबाळे यांच्या अध्यक्षतेखाली सांगोला येथे पार पडली.

या बैठकीमध्ये सुरुवातीला तालुका महासचिव स्वप्निल सावंत यांनी प्रस्तावित केले. तसेच त्यांनी उपस्थित पदाधिकारी यांना वंचित बहुजन आघाडी या पक्षाची ध्येय धोरणे व तालुक्यामध्ये पक्ष वाढीसाठी काय केले पाहिजे. याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच यावेळी गाव तिथे वंचित बहुजन आघाडीची शाखा स्थापन करणे. तसेच घरकुल, रेशन संबंधित असणाऱ्या नागरिकांच्या अडचणी यासह विविध सामाजिक उपक्रम राबवणे, तसेच नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे. यासह अनेक विषयावरती सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी तालुका उपाध्यक्ष लकी कांबळे,कपिल बनसोडे,अक्षय कांबळे, विनोदकुमार कसबे,सचिव दीपक होवाळ, सचिन उबाळे,संघटक समाधान होवाळ,संतोष पवार,पोपट तोरणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

तसेच यावेळी आगामी काळात मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही चर्चा करण्यात आली. तसेच लवकरच वंचित बहुजन आघाडीची विस्तारित तालुका कार्यकारणी, व युवक आघाडी,महिला आघाडी यांच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या जातील. इच्छुकांनी त्वरित वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष विनोद (भैय्या) उबाळे यांच्याशी संपर्क साधावा असे वंचित बहुजन आघाडीचे तालुका प्रसिद्धीप्रमुख वैभव काटे यांनी सांगितले.

Exit mobile version