सामाजिक उपक्रमातून गोरंबेत रक्तदान शिबीर 47 रक्तदात्यांचे रक्तदान 

व्हनाळी : सागर लोहार 
रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान” असे समजले जाते.  शहरातील  शासकीय रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. अशा प्रसंगी तरुणाईमध्ये रक्तदानाचे  महत्त्व रुजविणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने  गोरंबे ता.कागल येथे राष्ट्रप्रेमी कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालय कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक उपक्रमातून रक्तदान शिबीर घेण्यात आले. त्यामध्ये 42 युवकांनी व 5 महिला असे 47 रक्तदात्यांनी रक्तदान करून या सामाजिक उपक्रमास सहकार्य केले.
रक्तदान शिबीराचे उदघाटन मंडळाचे अध्यक्ष जगदिश पाटील उपाध्यक्ष साहिल मगदूम यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी सदस्य शिवाजी पाटील,विनायक वैद्य,आप्पासो पाटील,सागर पाटील,बाजीराव पाटील,प्रकाश वासकर,संजय मोरे, डॅा.कानिया,डॅा. प्राची,औंदकर,रणजित चेचरे,दत्ता यवरे,जयवंत कदम ,उत्तम पाटील ,राहुल धनवडे  आदी उपस्थीत होते.
फोटो ओळी – गोरंबे ता.कागल येथील रक्तदान शिबीरातील रक्तदात्यांना प्रमाणपत्रे वितरण प्रसंगी उपस्थित डॅा.कानिया व मंडळाचे कार्यकर्ते. छायाचित्र – सागर पाटील,गोरंबे.
चौकट…महिलांचाही सहभाग…
अनेक ठिकाणी रक्तदान शिबीरामध्ये युवकच रक्तदान करताना दिसतात परंतू गोरंबे सारख्या ग्रामिण भागातील शेतकरी महिलाही रक्तदान शिबीरामध्ये रक्तदान करण्यासाठी पुढे येवून पाच महिलांनीही रक्तदान केले त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ALSO READ  बाबुराव बंडगर (बी.आर.)यांच्या नेतृत्वाखाली कमलापुर भागातील शेतकऱ्यांचे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Leave a Comment

‘झलक दिखला जा 11’वर अत्यंत गंभीर आरोप, लोकांचा संताप, शिव ठाकरेचे चाहते आक्रमक TOP POINTS Farmer’s Protest: Continuing Until Demands Met Best Phones Under 20,000 Top 10 Wireless Earbuds Under 2000