Site icon Tufan Kranti

विरोधकाला काढण्यासाठी सज्जव्हा – उद्धव ठाकरे

विरोधकाला काढण्यासाठी सज्जव्हा - उद्धव ठाकरे
गडब/सुरेश म्हात्रे
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूीवर रायगड जिल्हा दौऱ्यावर असलेले शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धवर ठाकरे यांनी पेणमधील सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपव टीकास्त्र सोडले
अगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूीवर रायगड जिल्हा दौऱ्यावर असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पेणमधील सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपव टीकास्त्र सोडले. आगामी लोकसभा निवडणुकीत चारशे पारचा नारा देणाऱ्यांना मग नितीश कुमार का लागतात? असे म्हणत वर्तमानपत्रात माजी मुख्यमंत्री सोरेन यांना अटक तर उपमुख्यमंत्री अजित पवारांना क्लीनचिट अशा बातम्या छापून आल्या. तेव्हा जो सोबत येईल तो क्लीन आणि जो विरोधात असेल त्याला अटक अशी रणनीती भाजपची असल्याचेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.पेणच्या सभेत बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, मी नाशिकच्या सभेमध्ये जे बोललो होतो की, आज आपण काँग्रेस सोबत गेलो. आजही या मंचावर काँग्रेससह शेकापचे कार्यकर्ते आहेत. शेकाप पक्षाचे जयंत पाटील आमचे निकटवर्तीय आहेत. पण रायगडकरांना मी जरा वेगळ्या पद्धतीने धन्यवाद देतोय. कारण, त्यावेळीसुद्धा रायगड मोदी लाटेत वाहून गेला नाही. विरोधात मतदान केलं होतं. आता रायगडमधून जो निवडून आला तो मोदी लाटेत वाहून गेला, पण माझा रायगड तसाच आहे. असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी खासदार सुनील तटकरे यांचं नाव न घेता त्यांच्यावर हल्लाबोल करताना घराणेशाहीवर टीका केली.
आता आपण हुकूमशाहीच्या विरोधात उभं राहिलेलो आहोत. नुसतं मोदींच्या विरोधात नाही, मी व्यक्तीच्या विरोधात नाही आम्ही हुकूमशाहीच्या विरोधात उभे राहिलो आहोत. लोकशाही विरुद्ध हुकूमशाही अशी ही लढाई आहे.
रायगडमध्ये मला नाही वाटत जास्त काही प्रचार करण्याची गरज आहे. कारण गेल्या वेळेला एवढं करूनसुद्धा रायगड ताठ मानेनं मोदी विरोधात उभा राहिला होता. आता तर मोदी लाटेच्या विरोधात सुनामीसारखं मतदान होणार आहे. असाही विश्वास उद्धव ठाकरेंनी यावेळी व्यक्त केला.शिवसेना उ.बा. ठा. गटाचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांचा जनसंवाद दौऱ्यांतर्गत पेण येथील प्रायव्हेट हायस्कूल समोरील पटांगणात भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, बबनदादा पाटील, रशादशेठ मुजावर, किशोरभाई जैन, विष्णुभाई पाटील, जगदीश ठाकूर – तालुकाप्रमुख, शिशिर धारकर, मिहीर धारकर, नरेश गावंड, प्रदीप वर्तक, अच्युत पाटील, उत्तम वाघ, समीर म्हात्रे, हिराजी चोगले, जीवन पाटील, शिवाजी म्हात्रे, चेतन मोकल, राज मोकल, दिपश्री पोटफिडे, विजय पाटील, नरेश सोनावणे, तुकाराम म्हात्रे, किर्तीकुमार कळस, बाळा म्हात्रे, महेश पोरे, कमलाकर पाटील, योगेश पाटील यांच्यासह
पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या जनसंपर्क सभेच्या निमित्ताने शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे प्रथमच पेण येथे येत असल्याने शिवसैनिका मध्ये उत्साह दिसून येत होता.
यावेळी पुढे बोलताना उध्दवजी ठाकरे यांनी, ‘भ्रष्टाचार करा भाजपात
या,कुछ नही होगा, मोदी गॅरंटी है. तुम्हाला मुख्यमंत्रीपद मिळेल, तुम्हाला उपमुख्यमंत्री पद मिळेल. आरोप करणारे हेच, पक्षात घेणारे हेच, क्लीनचिट देणारे हेच, आणि जे सोबत येत नाहीत, म्हणजे एकाच दिवशी, नितीश कुमार भाजपासोबत गेले, ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आणि दुसऱ्या दिवशी, लालू प्रसाद आणि तेजस्वीला ईडीकडून नोटीस. तेव्हा मोदी गॅरंटी तुम्हाला परवडणार आहे का? तेव्हा हुकूमशाहीच्या विरोधात राहतील त्यांना हे तुरुंगात टाकतायेत मग तुम्ही विचार केला पाहिजे, तुम्ही आता तरी डोळे उघडा. ही लढाई भाजप विरुद्ध विरोधी पक्ष अशी नाही. ही लढाई लोकशाही विरुद्ध हुकूमशाही अशी असल्याचे सांगितले.
Exit mobile version