सिरोंचा:
सिरोंचा तालुकाजवळ आसलेल्या तेलंगणा राज्यातील कोटापल्ली तालुक्यातील लक्ष्मीपूर गावाजवळील वीट उत्पादक कंपनीत गेल्या अनेक महिन्यांपासून काम करणाऱ्या कोटा राजेश आणि नैनी या दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
या घटनेमुळे लक्ष्मीपुर गावासह सिरोंचा परीसरातही एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच कोटापल्ली पोलिसांनी तत्काळ लक्ष्मीपुर येथे घटनास्थळ गाठून तपास सुरू केला आहे. कोटापल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गळफास घेऊन आत्महत्या केल्याची स्पष्ट आहेत, पण आत्महत्येची केल्याची स्पष्ट माहिती मिळाली नाही, ही घटना रात्रीच्या अंधारात झाल्याचे अंदाजे आहेत.
आत्महत्या केलेल्या राजेश आणि नैनी यांचे कोटापल्ली तालुक्यातील सर्वयपेठा गावाचे असल्याचे माहिती मिळाली आहे,
पुढील तपासानंतर परिपूर्ण माहिती देण्यात येईल असे कोटापल्ली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (CI) सुधाकर यांनी पत्रकार परिषदेतून माहिती दिली आहे.