सोलापूर/ प्रतिनिधी
केगाव येथील एन.बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय मध्ये उमंग २ के २४ चा मोठ्या उत्साहात व जल्लोषात समारोप झाला. एका पेक्षा एक मराठी, हिंदी गाण्यावर नृत्याविष्कार, शोभायात्रा, ट्रॅडिशनल डे ,फनी गेम्स, समूह गायन ,लावणी ,फॅशन शो अशा एकापेक्षा एक कला प्रकारात विद्यार्थ्यांनी आपली कला सादर करून उपस्थित यांची मने जिंकली. सांस्कृतिक विभागामध्ये कॉम्प्युटर सायन्स विभागाने तर क्रीडा स्पर्धेत इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही केगाव येथील एन.बी. नवले सिंहगड महाविद्यालयाच्या वतीने क्रीडा विभागासाठी इथुजिया २के २४ ही स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये महाविद्यालयातील सहा विभागातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये क्रिकेट, बास्केटबॉल, हॉलीबॉल चेस ,कॅरम , कबड्डी, खो-खो, टेबल टेनिस यासह इतर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत खेळाडूंनी उत्कृष्ट सादरीकरण केले. क्रीडा विभागाचे सर्वसाधारण विजेतेपद इलेक्ट्रिकल विभागाने पटकाविले. दुसऱ्या दिवशी सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरात शोभायात्रा घेण्यात आली. या शोभायात्रेमध्ये पंढरीची वारी, पर्यावरण वाचवा, भारतीय संस्कृती यासह विविध विषयावर प्रबोधन करण्यात आले. त्यानंतर पारंपरिक वेशभूषा ही स्पर्धा झाली. या स्पर्धेत राजस्थानी, महाराष्ट्र ,उत्तर प्रदेश, कर्नाटक येथील संस्कृतीचे दर्शन झाले. त्यानंतर फनी गेम्स, समूह नृत्य, समूह डान्स ,लावणी, फॅशन शो अशा एकापेक्षा एका स्पर्धेत उत्कृष्ट असे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. दरम्यान सांस्कृतिक विभागाचे सर्वसाधारण विजेतेपद कॉम्प्युटर सायन्स विभागाने पटकाविले.
दरम्यान विजेत्यांना सिंहगड संस्थेचे सहसचिव संजय नवले ,प्राचार्य डॉ.शंकर नवले उपप्राचार्य डॉ.रवींद्र व्यवहारे व डॉ.शेखर जगदे, सिंहगड पब्लिक स्कूलच्या प्राचार्य निखत शेख, उपप्राचार्य प्रकाश नवले, डॉ. विनोद खरात ,डॉ.विजय बिराजदार ,डॉ. करीम मुजावर ,डॉ.दत्तात्रय गंधमल, डॉ.प्रदिप तपकीरे, प्रा.लक्ष्मी जंगम यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
——
चौकट
मिस्टर सिंहगड पियूष सोनवणे तर मिस सिंहगड गौरी जिंदे ठरली.
सिंहगड महाविद्यालयाच्या वतीने आयोजित उमंग २ के २४ मध्ये मिस्टर सिंहगड म्हणून पियुष सोनवणे तर मिस सिंहगड म्हणून गौरी जिंदे या बनल्या आहेत. ट्रॉफी आणि मुकुट घालून त्यांचा सन्मान करण्यात आला.
——-
चौकट
सांस्कृतिक स्पर्धेमध्ये समूह आणि सोलो डान्स मध्ये, आज काल पाटलांचा, लय
ई रुबाब, जोगवा, खली बली हो गया है दिल, धनगरी नृत्य अशा एका पेक्षा एक मराठी, हिंदी गाण्यावर नृत्य करीत उपस्थित यांची मने जिंकली. उपस्थितांना ठेका धरायला लावले.
——
चौकट
उमंग २ के २४ असा आहे निकाल
- प्रथम क्रमांक रांगोळी स्पर्धा– शिवदास सोलापूरे,
- मेहंदी– वैष्णवी पाटील,
- वक्तृत्व– गौरी जिंदे अँड टीम
- वाद-विवाद– गौरी जिंदे अँड टीम,
- फोटोग्राफी– अनन्या मेंचलेकर
- प्रश्नमंजुषा– आरती ओमने आणि ग्रुप
- सोलो सिंगिंग– प्रसाद मंचले
- ग्रुप सिंगिंग– प्रसाद मंचले अँड ग्रुप
- सोलो डान्स -श्रुतिका महिंद्रकर
- समूह नृत्य– जनरल सायन्स डिपार्टमेंट