शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजचे हिवाळी परीक्षा 2023 मध्ये उत्तुंग यश

शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजचे हिवाळी परीक्षा 2023 मध्ये उत्तुंग यश

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ,मुंबई यांनी घेतलेल्या अभियांत्रिकी पदविका हिवाळी परीक्षा 2023 मध्ये शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले असल्याची माहिती संस्थेचे सचिव श्री. अंकुशराव गायकवाड व प्राचार्य डॉ. आर. ए. देशमुख यांनी दिली. एकूण 527 विद्यार्थ्यांनी सदर हिवाळी परीक्षा दिली त्यापैकी 56 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहेत तर 207 विद्यार्थी 80% पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. तसेच एकूण 22 विद्यार्थ्यांनी विविध विषयात 100 पैकी 100 गुण प्राप्त केले आहेत. प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविकेचा निकाल 80 %टक्के लागला असून अंतिम वर्षाचा निकाल 85% टक्के लागला आहे. प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविकेच्या आशुतोष कोडग( 92.59), शुभम माने(92.59) यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. वैष्णवी भोसले (92.24) , मेहुल शिंदे(91.88) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला आहे. द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविकेच्या संगणक विभागातील सानिका पवार(95.60), वैष्णवी चक्रे (94.40) व स्वप्नाली पाटील (94.27) यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. अंतिम वर्ष अभियांत्रिकीकेच्या इलेक्ट्रॉनिकस अँड टेली कम्युनिकेशन विभागातील प्रतीक्षा हासबे ( 96.32), मोनाली फराटे( 96.21) आकाश रुपनर( 93.37) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला आहे.

ALSO READ  नव महाराष्ट्र संघ गणेश मंडळाच्या वतीने तालुक्यात प्रथमच अष्टविनायक दर्शन देखावा 

 

शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजचे हिवाळी परीक्षा 2023 मध्ये उत्तुंग यश

प्रथम वर्षातील 90% पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांची नावे खालील प्रमाणे:

आशुतोष कोडक(92.59), शुभम माने(92.59), वैष्णवी भोसले(92.24), मेहुल शिंदे(91.88), तहुरा मुल्ला(90.71), कार्तिक चव्हाण(90.59), शाहिद मुजावर(90.35), अविनाश गव्हाणे(90.24), समीक्षा यादव(90.12), यशराज देशमुख(90.00), अदिती माने(90.00), प्रीती घाडगे(90.00), ऋषिकेश शेंडगे(90.00), साक्षी मेहकले(90.00), स्वप्नाली दिवसे(90.00), शितल सावंत(91.40) व स्वप्नाली शिंदे(90.00) द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविकेचे 90% पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेले विद्यार्थी खालील प्रमाणे. सानिका पवार(94.60), वैष्णवी चक्रे(94.40), स्वप्नाली पाटील(94.27), दिवसे स्नेहल(93.73), प्रांजली इंगवले(92.67), कोमल सुरवसे(92.53), आर्या देशमुख(92.27), स्नेहल झांबरे(92.27), सानिका इंगवले(91.33), प्रवीण घाडगे(91.07), सायली गव्हाणे(90.67), विश्वजीत चांडोले(90.40), पल्लवी लिगाडे (93.41), तनुश्री खटकाळे(92.59), मेघा गायकवाड(92.47), तुषार दिघे(90). अभियांत्रिकी पदविकेच्या अंतिम वर्षात 90% पेक्षा जास्त गुण मिळवणारे विद्यार्थी खालील प्रमाणे: सज्जन पवार(92.89), यश सावंत(92), समर्थ चौगुले(91.89), रोहित लेंडवे(91.78), शुभम गायकवाड(91.56), साहिल जाधव(91.56), केदार महामुनी(91.11), प्रणाली गायकवाड(91), श्रुती सावंत(90.78), प्रगती पाटील(90.78), श्रेयश डोंगरे(90.67), ऋतुजा इंगवले(90.56), वैशाली गायकवाड(90), श्रुती झपके(90), प्रतीक्षा हासबे(96.32), मोनाली फराटे(96.21), आकाश रुपनर(93.37), किशोरी दौंड(93.05), ऋतुजा पाटील(92.95), ऋषिकेश घोरपडे(90.95), संदेश साळुंखे(93.10), प्रवीण बंडगर(92.10), ऐश्वर्या वाघमोडे(90.40) बेसिक मॅथेमॅटिक्स या विषयात ऋषिकेश शेंडगे, प्रीती गाडगे, शुभम माने व आशुतोष कोडग या विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण प्राप्त करून बोर्डात पहिले आले आहेत. वैशाली गायकवाड व सज्जन पवार या विद्यार्थ्यांनी इ. एस .टी. विषयात 100 पैकी 100गुण मिळवले आहेत. स्नेहल दिवसे, स्नेहल झांबरे, वैष्णवी चक्रे, विश्वजीत चांडोले, स्वप्नाली पाटील या विद्यार्थ्यांनी ओ.ओ.पी. या विषयांमध्ये 100 पैकी 100 गुण प्राप्त केले आहेत. सानिका पवार या विद्यार्थिनीने डी. एम. एस. या विषयात 100 पैकी 100गुण मिळविले आहेत. स्नेहल झांबरे व प्रांजल इंगवले या विद्यार्थिनींनी डी. टी .इ. या विषयात 100 पैकी 100 गुण मिळवून उत्कृष्ट यश मिळविले आहे. प्रतीक्षा हासबे, ऋतुजा वाघमोडे या विद्यार्थिनींनी एम. डब्ल्यू. सी.या विषयात 100 पैकी 100 गुण प्राप्त केले आहेत. मायक्रोवेव्ह अँड रडार या विषयात प्रतीक्षा हासबे व आकाश रुपनर या विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण प्राप्त केले आहेत. पल्लवी लिघाडे, साक्षी इंगवले व वैष्णवी लेंडवे या विद्यार्थिनींनी डिजिटल टेक्निक्स या विषयात 100 पैकी 100 गुण मिळवून कॉलेजचा नावलौकिक वाढविला आहे. संस्थेचे अध्यक्ष श्री. बाबुराव गायकवाड, सचिव श्री. अंकुशराव गायकवाड , विश्वस्तमंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी सर्व प्रकारच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. कॉलेजमधील अनुभवी शिक्षक वृंद, नियमित घेतल्या जाणाऱ्या सराव परीक्षा, तज्ञ प्राध्यापकांची गेस्ट लेक्चर्स, रात्र अभ्यासिका यामुळे विद्यार्थ्यांनी तंत्र शिक्षण मंडळाच्या परीक्षेत उत्तुंग यश मिळवले असल्याचे मत सचिव श्री. अंकुश गायकवाड यांनी व्यक्त केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष श्री. बाबुराव गायकवाड, सचिव अंकुशराव गायकवाड, सर्व विश्वस्त मंडळ, प्राचार्य, विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.

ALSO READ  शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न

Leave a Comment

‘झलक दिखला जा 11’वर अत्यंत गंभीर आरोप, लोकांचा संताप, शिव ठाकरेचे चाहते आक्रमक TOP POINTS Farmer’s Protest: Continuing Until Demands Met Best Phones Under 20,000 Top 10 Wireless Earbuds Under 2000