Site icon Tufan Kranti

१ पासून कुस्ती प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) :-  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यलय भंडारा व जाणता राजा कुस्ती प्रशिक्षण केंद्र भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने कुस्ती प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दिनांक १ जुन ते ३० जुन २०२४ पर्यंत या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज, जिल्हा क्रीडा संकुल कुस्ती प्रशिक्षण केंद्र येथे करण्यात आले आहे.
        सदर प्रशिक्षण शिबिरात ५ ते ३० वर्षाच्या मुला – मुली तसेच प्रौढ वयोगटासाठी राहणार असून प्रशिक्षक म्हणून राष्ट्रीय पंच, उस्ताद व राज्यस्तरीय खेळाडू यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंना शिबिरात प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
        कुस्ती प्रशिक्षणाची वेळ सकाळी ६ ते ८ व सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत राहणार आहे.
       तरी जिल्ह्यातील नव-नविन व जास्तीत जास्त खेळाडूंनी कुस्ती प्रशिक्षण शिबिराचा लाभ घेण्यासाठी प्रशिक्षक अशोक बन्सोड- ९८६०७६२०२२, विलास केजरकर- ८६६८४१२०९०, शुभम बागडे- ७०२०९७१२१९ यांच्याशी संपर्क साधून नावांची नोंद करावी असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे यांनी केले आहे.
Exit mobile version