सांगोला:
मौजे डिकसळ ता. सांगोला येथुन दिनांक १३/०७/२०२४ रोजी रात्रौ २१/०० वा.चे सुमारास मौजे डिकसळ ता. सांगोला गावचे शिवारात शिवनेरी हॉटेल समोर डिकसळ पाटी येथुन भारत काकासो म्हारनूर रा. हाबीसेवाडी ता. सांगोला यांची ३५,०००/- एका हिरो स्पेल्डर मो. सायकल बिगर नंबरची त्याचा चेसी नंबर MBLHAW224P5C51749 इंजिन नंबर HA11E7P5C00707 असा असलेला जुवाकिंअ ही कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेले बाबत सांगोला पोलीस स्टेशन येथे गुरनं ५७०/२०२४ बीएनएस का. कलम ३०३ (२) प्रमाणे अज्ञात चोरटयाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर गुन्हयाचा तपास हा पोहेकॉ/१२६४ संजय भानवसे हे करत होते त्यांना तपासात मदत पोहेकॉ/३११ बजरंग बोराटे, पोना/१२४८ अंकुश नलवडे, पोकों/निशांत सावजी हे करत होते दरम्यान दि. ३१/०७/२०२४ रोजी रात्रौ कडलास येथील पेट्रोल पंपावर दोन अल्वयीन मुले ही मोटर सायकलसह मिळुन आल्याने तेथील कर्मचारी याचे मदतीने त्यांना ताब्यात घेण्यात आले असता सदर मुलाकडे असलेले मोटरसायकल बाबत त्याचे कडे तपास केला असता सदरचे मोटर सायकली या चोरीच्या असल्याचे त्यांनी कबुल केले त्यानंतर त्याचे कडे अधीक विश्वासात घेवुन तपास केला असता त्यांनी मो. सायकल चोरी करून त्या आरोपी आकाश शशिकांत हातेकर रा. घेरडी ता. सांगोला यास विक्री केले बाबत सांगीतल्याने आकाश हातेकर यास ताब्यात घेवुन त्याचे कडे तपास केला असता त्याने गुन्हयाचे कामी कबुली दिली व त्याने एकुण १३ मोटर सायकल चोरी केल्याचे मान्य केले व सदर १३ मोटर सायकली एकुण किंमत ५,०९,०००:-रू चा मुद्देमाल हा गुन्हयाचे तपासात जप्त करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी ९ मोटर सायकली या सांगोला पोलीस स्टेशन हद्दीतुन वेगवेगळ्या ठिकाणावरून चोरी केलेल्या असुन ४ मोटर सायकली या जत जि. सांगली भागातुन चोरी केलेल्या आहेत. सदर दोन्ही अल्पवयीन मुलांना त्यांचे आईला समजपत्र देवुन त्याचे ताब्यात देण्यात आलेले असुन यातील आरोपी आकाश शशिकांत हातेकर रा. घेरडी ता. सांगोला यास दि.०१/०८/२०२४ रोजी अटक करण्यात आलेली असुन त्याची दि.०७/०८/२०२४ रोजी पर्यत पोलीस कस्टडी रिमांड चालु आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली चालु आहे.
सदर घटनेचा तपास मा. शिरीष सरदेशपांडे साो, पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण, मा. प्रितम यावलकर अपर पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रात गायकवाड मंगळवेढा विभाग मंगळवेढा याचे मार्गदर्शना खाली पोनि श्री एस. खणदाळे याचे सुचनाप्रमाणे पोहेकॉ/१२६४ संजय भानवसे पोहेकॉ/३११ बजरंग सुधाकर बोराटे, पोना/१२४८ अंकुश अशोक नलवडे, पोकॉ/२७६ निशांत सावजी, पोकॉ/८०८ सांबळे, चापोहेका / ३३८ भुजबळ यानी केलेली आहे.