सांगोला :
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पथदर्शक मंडळ रचना गठीत करण्यासाठी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यात प्रत्येक मंडलमध्ये ३०० पेक्षा जास्त बुथ संख्या असल्याने मंडल अध्यक्षांना बूथ प्रमुखांशी वेळेत संपर्कात राहणे व वेळ देणे अडचणीत होत होत आहे. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील , पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांच्या आदेशानुसार सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात तीन मंडल अध्यक्षांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून लवकरच नवीन अध्यक्षांची नियुक्ती करून कार्यकारणी जाहीर करण्यात येणार असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत त्यांनी सांगितले.
भाजपच्या वतीने आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यातील सांगोला, करमाळा, माढा, माळशिरस, पंढरपूर व बार्शी या विधानसभेतील भौगोलिक परिस्थिती पाहता मर्यादित बुधसंख्या असणारी मंडळ रचना करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ज्यामुळे पक्षातील नवीन तरुण व उत्साही मंडळींना या रचनेत स्थान देता येणे शक्य होणार आहे. ११५ ते १४० इतक्या बूथचे एक मंडल तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यात १४ मंडले तयार करण्यात आली आहेत. सांगोला विधानसभेसाठी सांगोला उत्तर, सांगोला दक्षिण, भाळवणी (पंढरपूर तालुका), करमाळा विधानसभेसाठी करमाळा, ग्रामीण करमाळा, कुर्डूवाडी (माढा तालुका), माढा विधानसभेसाठी माढा पूर्व, माढा पश्चिम, करकंब (पंढरपूर तालुका), माळशिरस विधानसभेसाठी माळशिरस पूर्व, माळशिरस पश्चिम, अकलूज शहर आणि बार्शी विधानसभेसाठी बार्शी ग्रामीण व बार्शी शहर अशी १४ मंडले तयार करण्यात आली आहेत. या नवीन मंडलांची कार्यकारणी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली