Site icon Tufan Kranti

आज जातीवरुन आरक्षण का?

 जातीचा भेदभाव…….आज जातीचा भेदभाव बऱ्याच ठिकाणी संपुष्टात आलाय. जात……… जात ही मोठी गोष्ट होती पुर्वीच्या काळात. या जातीवरुनच वाद होत असत व ते वाद विकोपाला जात असत. ते एवढे विकोपाला जात की चक्कं उच्च जाती कनिष्ठ जातींचे हालहाल करीत. कधी जातवरुन हत्याही.
         काही ठिकाणी जातीवरुन काही नियम बनवले होते. त्या नियमांचं पालन करणं अनिवार्य होतं. ते नियम खाण्यापिण्यावर व अत्याचारावर आधारीत होते. त्यात अश्लिलताही कुटकूट भरली होती. जर उच्च पदस्थ जातीच्या व्यक्तीनं कनिष्ठ जातीच्या स्रीवर बलात्कार केल्यास त्यांना शिक्षा नव्हती. परंतु कनिष्ठ जातीच्या व्यक्तीनं उच्च जातीच्या स्रीवर बलात्कार केल्यास त्याला जबरदस्त शिक्षा होती. आहारावरुनही भेदभाव होता. आहारावर तसं पाहता उच्च जातीचीच मक्तेदारी होती. कारण कृषक वर्ग त्यांच्याकडेच होता. त्यामुळंच कनिष्ठ जातींना अन्नच मिळायचं नाही. तसंच पोट ही महत्वपुर्ण बाब असल्यानं पोट भरणार कसं? पोटासाठी काहीही करावं लागेलच ना. म्हणूनच कनिष्ठ जातीतील पोटासाठी रानावनात फिरुन मेलेल्या जनावरांचं मांस गोळा करीत व ते खात असत. तसंच आगामी काळातही आपल्याला अन्नासाठी भटकावं लागू नये म्हणून ते अन्न वाळवून ठेवत असत व नंतर खात असत. कारण तसं मांस तद्नंतर मिळेलच याची शाश्वती नव्हती. अन्न मिळत नसे. त्यातच कोणी उच्चपदस्थ व्यक्तीनं एखाद्या वेळेस शिळे, बुरशी लागलेले, खराब झालेले अन्न दिले तरी त्या अन्नाचा ही कनिष्ठ जाती स्विकार करीत असे. कधी एखाद्या वेळेस एखाद्या उच्च पदस्थ माणसाच्या घरी एखादं जनावर मरण पावलं तर ते आनंदाने ओढत असत. कारण त्यांना ते जनावर फेकत असतांना अन्न म्हणून खायला ताजं मांस मिळायचं.
          अधिवासासंबंधीही भेदभावच होता. सामान्यतः कनिष्ठ जाती या वेशीच्या बाहेर राहात. गावाच्या मध्यभागी उच्च जाती राहात. त्यात जंगलातील एखाद्या हिंस्र प्राण्यानं गावावर हल्ला केल्यास तो हल्ला प्रथम याच लोकांवर होत असे व हेच लोकं त्याचा प्रतिकार करुन त्या प्राण्यांना गावाच्या वेशीवरुनच हाकलून देत. गावात शिरु देत नसत. त्या गावाचं संरक्षण करीत. परंतु त्यातील एखाद्यानं जरी गावात घर घेतो म्हटलं वा बांधतो म्हटलं तर गावाला विटाळ होत असे.तसं पाहिल्यास त्यांना गावातच ये जा करायला बंदी होती. ते गावात येत. परंतु त्यांचे काही नियम होते. जसे किंचाळ्या मारत चालणे. सूर्योदयापूर्वी नमस्कार सुर्यास्तानंतर गावात न जाणे. ते नियम मोडल्यास कडक शिक्षा केल्या जात असत.
          पाणी वापराचे व पिण्याचेही नियम होते. पाणी हे कोणत्याही विहिरीला हात लावून पिता येत नव्हते. तसंच ते पाणी ओंजळीनं दुरुन प्यावं लागायचं. पाणवठे वेगवेगळे होते. ज्यातून हक्काचं पाणी पीता येईल. कनिष्ठ जातींसाठी वेगळे पाणवठा होते. तसेच रस्ते वापरासंबंधीही नियम होते. रस्ते वापरतांना विशेषतः रस्त्याचे प्रकार होते. कनिष्ठ जातींचा वेगळा रस्ता होता व उच्च जातींचा वेगळा. जेणेकरुन एकमेकांचा चालतांना एकमेकांना स्पर्श होवू नये आणि स्पर्श झालाच तर विटाळ झाला असं समजून स्पृश्यांनी अंघोळ करणे वा गोमूत्र अंगावर शिंपण्यासारखे प्रकार होते. ज्यातून स्पृश्य व्यक्तीचं शुद्धीकरण होते असा भ्रम लागू केला होता.
          व्यवसायावरही निर्बंध टाकलेले होते. व्यवसाय निवडीचं स्वातंत्र्य नव्हतं. कोणीही कोणताही व्यवसाय निवडू शकत नव्हतं. असं जर कोणत्या जातीनं केलं तर त्यानं नियम मोडला हे गृहीत धरुन त्यांना कडक शिक्षा केल्या जात असत. तसेच विवाहातही नियम होते. कनिष्ठ जातीतील मुलगी सुंदर असली तर ती आपली इच्छाभेदन करण्यासाठी उच्च जातींना चालत असे. मात्र कनिष्ठ जातीनं असं केल्यास त्याची हत्याच केली जात असे वा डोळे फोडले जात असत आणि हे दुष्कर्म राजाची इच्छा नसतांनाही त्यांच्याकडूनच केले जात असत.
          जातीवर आधारीत भेदभाव. त्यानंतर निर्माण झालेले प्रसंग. त्यांचं जनावरांसारखं जीवन जगणं. त्यातूनच आरक्षण लागू करण्याचा विचार. तो विचार रास्त आहे. त्यामुळंच काही लोकांना वाटतं की आमच्यावर जातीव्यवस्थेतील या उच्च जातीनं विविध बंधनं टाकली होती. त्यामुळंच आम्ही अत्याचार सहन केला. अत्याचाराच्या कळा शोषल्या. ज्या अत्यंत वेदनादायी होत्या. आज खरी आरक्षणाची गरज आम्हालाच आहे. जे आम्हाला मिळालंही. परंतु आज तेच अत्याचार करणारे आरक्षण मागू पाहात आहेत की ज्यांनी काल आमच्यावर अत्याचार केला नव्हे तर अत्याचार सोसायला मजबूर केलं.  आज तेच लोकं सांगत आहेत शहाणपण आणि सन्मानानं आरक्षण मागत आहेत की जे त्यांचं आरक्षण मागणं योग्य नाही. आता त्यांचे हाल होत आहेत किंचीतसे. तर ते ओरडत आहेत, ते किंचीतसे होत असलेले हाल पाहून आणि आमच्या पिढीदरपिढीनं आयुष्यभर वेदनादायी अत्याचार सहन केले. तरीही कधीच तोंडातून ब्र देखील काढला नाही. अत्याचार करणाऱ्यात त्यांचाही समावेश होता आणि आज तेच आरक्षण मागत आहेत. जे काल सत्तेवर होते आणि आजही सत्तेवर आहेत. तरीही आज तेच आरक्षण मागायला लागले आहेत.
          आरक्षण हे भेटायलाच हवं. त्याचा कोणाला विरोध नाही. परंतु काल ज्यांनी एका विशिष्ट जातीवर अत्याचार केला. त्यांनी जर आज आरक्षण मागीतलं तर आरक्षणाची खिल्ली काढल्यासारखी वाटते. ते बरोबर वाटत नाही.
          महत्वपुर्ण गोष्ट ही की त्या जातीनं आरक्षण मागूच नये की ज्यांनी काल एका विशिष्ट जातीवर अत्याचार केला वा ज्यांनी अत्याचार केला. त्यांना एकप्रकारे त्यांचे नियम पाळून अत्याचार करणाऱ्यांना मदतच केली. त्यांनी तर आरक्षण सौहार्दपूर्ण सोडायला हवं. कारण गतकाळात त्यांच्याच पिढीनं एका विशिष्ट पिढीला अनन्वीत त्रास दिला. जो त्रास शब्दातही मांडता येणं शक्य नाही. त्यामुळंच आता जर आरक्षण द्यायचंच झालं तर जातीवरुन आरक्षण कुणालाही देवू नये. आरक्षण द्यावं ते आर्थीक निकषावरुनच. ज्यातून कोणीही कोणाला जातीवरुन आरक्षण का? असा प्रश्न विचारणार नाही व नव्या वादाला कधीच तोंड फुटणार नाही. हे तेवढंच खरं.
Exit mobile version