Site icon Tufan Kranti

सांगोला येथे लय भारी साहित्य समूहातर्फे चौथे राज्यस्तरीय कवी संमेलन संपन्न 

 सांगोला: 
सांगोला येथे २६ मे २०२४ रोजी लय भारी साहित्य समूह यांच्या वतीने एक दिवसीय राज्यस्तरीय ४ थे कवी संमेलनाचे आयोजन सदानंद मल्टीपर्पज हॉल सांगोला येथे करण्यात आले. या संमेलनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक कवी / कवयित्री / लेखक / पत्रकार /समाजसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत मा. गौसपाक मुलाणी यांनी आपल्या स्वागतगीताने स्वागत केले.
 आदरणीय ज्येष्ठ साहित्यिक बापमाणूस चंद्रकांतदादा वानखेडे ( संमेलनाध्यक्ष ) मा. सुदाम भोरे साहेब (शुभहस्ते ) माणदेश कवी मा. लक्ष्मण हेंबाडे  ( स्वागताध्यक्ष )मा. कैलास क्षीरसागर ( उद्घाटक ) या मान्यवरांनी कवी संमेलनाचे दीपप्रज्वलन केले. कवी संमेलनाची सुरुवात अत्यंत प्रभावशाली झाली. पहिल्या सत्राचे अध्यक्ष  मा. प्रा. अरुण कांबळे बनपुरीकर, प्रमुख पाहुणे  मा. पियुष दादा साळुंखे पाटील  (  यशोजीवन हॉस्पिटल सांगोला ) मा. पुरुषोत्तम सदाफुले (ज्येष्ठ साहित्यिक)मा. डॉ.  शिवाजी शिंदे( सहकुलसचिव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर ) मा. वैजिनाथ घोंगडे ( अध्यक्ष माणगंगा सेवा संस्था )मा. यशराजे साळूंखे पाटील (युवा नेते ) मा. सचिन भुसे ( सांगोला वृत्तवेध संपादक ) या मान्यवरांच्या मार्गदर्शनाने प्रथम सत्र संपन्न झाले. यानंतर द्वितीय सत्राच्या अध्यक्षा  मा. विनिता कदम  (ज्येष्ठ साहित्यिका मुंबई ) प्रमुख पाहुणे मा. विजयकुमार पांचाळ छत्रपती संभाजीनगर  ( विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार महाराष्ट्र शासन राज्यपाल हस्ते पुरस्काराने  सन्मानित)मा. विजय खाडे  (कवी / लेखक / गझलकार / गीतकार )मा. उज्वला शिंदे )(साहित्यिका पंढरपूर ) यांच्या मार्गदर्शनाने दुसरे सत्र संपन्न झाले. महाराष्ट्रातील आलेल्या साहित्यिकांनी आई,बाप, देश, भूक,समाजातील पीडीत महिलांचे वास्तव, शेतकरी,प्रेम कविता देशप्रेम,संविधान या विषयांवर उत्कृष्ट कविता सादरीकरण झाल्या. कॅप्टन रावसाहेब साळुंखे  ( सेना मेडल अध्यक्ष मा. सै. संस्था सांगोला ) यांचा लय भारी साहित्य समूहाच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक बापमाणूस  मा. चंद्रकांतदादा वानखेडे यांनी आपल्या पहाडी आवाजात मंत्रमुग्ध केले. त्यांनी आईबाप या विषयावर मार्गदर्शन केले.साहित्यिक म्हणजे समाजप्रबोधन करणारे माध्यम आहे. आई-वडिलांना अंतर देऊ नका, तुम्हाला आयुष्यात काहीच कमी पडणार नाही. समाजातील दुःख कमी करण्याचे काम साहित्यिक करत आहेत. दगडाचे फुल करण्याची ताकद साहित्यिकांमध्ये असते. असेही ते म्हणाले
 काळी आई काळजात
टिळा मातीचा लावीन
 शेवटचे श्वास माझे
 माय मराठी गाईन
 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. अनिल केंगार यांनी केले. तर या कार्यक्रमाचे आयोजन अनिल केंगार,रंजना मांगले, गौसपाक मुलाणी,खंडू भोसले, अमीर पटेल,योजना मोहिते, संतोष रायबान,समाधान मोरे, मोहिद्दीन अली मुलाणी, सुवर्णा तेली,हर्षदा गुळमिरे,सुनिता कपाळे यांनी केले.नेहमीप्रमाणे या कार्यक्रमासाठी  सुद्धा पियुषदादांची मोलाची लाभली.तर या कार्यक्रमाचे आभार  मा. संतोष बाजीराव रायबान  सर यांनी मानले. अत्यंत आनंदी प्रसन्न वातावरणात यशस्वीरित्या संमेलन संपन्न झाले.
Exit mobile version