फसवून पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा शेतकरी कामगार पक्षामध्ये पुन्हा प्रवेश

सांगोला:
सांगोला तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकोप्याने विचार विनिमय करून निर्णय घेतात. सर्व कार्यकर्ते सुद्धा प्रत्येक निर्णयामध्ये सहभागी असल्यामुळे पक्षाचे काम मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. सांगोला तालुक्यात आगामी विधानसभा निवडणुकीत लाल बावटा फडकवण्याचा संकल्प नाझरे येथील शेतकरी कामगार पक्षाच्या स्वगृही परतलेल्या कार्यकर्त्यांनी केला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख व डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नाझरे येथील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वगृही सोमवार दिनांक ४ नोव्हेंबर रोजी प्रवेश केला आहे. डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी जालिंदर बाबू वाघमारे, उत्तम हरिबा वाघमारे, दिपक मोहन वाघमारे, नंदकुमार एकनाथ वाघमारे, अजित उत्तम वाघमारे यांनी पुन्हा शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला.यावेळी डॉ बाबासाहेब देशमुख यांनी सर्वांचे स्वागत करून शेतकरी कामगार पक्षात आपणास योग्य तो मानसन्मान दिला जाईल असे आश्वासन देवून सर्वांचे स्वागत केले.
यावेळी हनुमंत सरगर (माजी सरपंच),राजाराम तानाजी वाघमारे ,बाळू शामराव वाघमारे , भरत शंकर वाघमारे ,दत्ता कांबळे , सागर वाघमारे , महेश भोसले यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते व पुरोगामी युवक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना नाझरे भागतून विक्रमी मताधिक्य देण्याचा निर्धार प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांनी जपलेले व रुजवलेले पुरोगामी विचार प्रत्यक्षात लोकांच्या मनामनात पोहोचवणारा शेतकरी कामगार पक्ष हा सत्य आणि वास्तव आहे. सर्व सामान्य नागरिक यामुळे डॉ.बाबासाहेब देशमुख व डॉ. अनिकेत देशमुख यांच्या पाठीशी आजही तेवढ्याच ताकतीनिशी सोबत असल्याचे दिसून येते. गैरसमज निर्माण करून व फसवून तालुक्यातील काही लोकांनी आम्हाला त्यांच्या पक्षात घेऊन गेले होते. परंतु नाझरे येथील शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यामुळे आम्हाला पुन्हा आमच्या हक्काच्या असणाऱ्या शेतकरी कामगार पक्षासाठी काम करण्याची संधी मिळाली असून शेतकरी कामगार पक्षाचा लालबावटा या तालुक्यावर पुन्हा फडकविण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे स्वगृही परतलेल्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.

ALSO READ  नांदगाव हद्दीत त्या पोलीसांनी तडजोडीने वाळूच्या गाड्या सोडल्याचा आरोप

Leave a Comment

‘झलक दिखला जा 11’वर अत्यंत गंभीर आरोप, लोकांचा संताप, शिव ठाकरेचे चाहते आक्रमक TOP POINTS Farmer’s Protest: Continuing Until Demands Met Best Phones Under 20,000 Top 10 Wireless Earbuds Under 2000