Site icon Tufan Kranti

लिंगपिसाटाचा १४ वर्षीय बालिकेवर अत्याचार!

गडब:

एका ६२ वर्षीय लिंगपिसाटाचा १४ वर्षीय बालिकेवर वारंवार अत्याचार केल्याने पेण तालुक्यात खळबळ माजली आहे. या घटनेचा गुन्हा वडखळ पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, यांतील फिर्यादी यांचे पतीचे मित्र यांतील आरोपी रमेश अंबाजी पाटील नामक (६२वर्षे) रा. डोलवी यांनी मैत्रीचा व ओळखीचा गैरफायदा घेवून फिर्यादी यांची मुलगी (१४वर्षे) पिडीत मुलगी ही अल्पवयीन व संमती देण्यास असक्षम असताना देखिल आरोपीत याने तिचे सोबत अश्लील चाळे व स्पर्श करून तिचे वडिलांना मारण्याची धमकी देवून तिचे बरोबर बोरी, कर्ला व लोणावळा या ठिकाणी नेऊन २०२२ पासून ऑक्टोबर २०२४ पर्यन्त वारंवार लैगिक अत्याचार केले म्हणून वडखळ पोलिस ठाण्यात गुन्हा. रजि. नं. व कलम- वडखळ पोलीस ठाणें सी आर नं. १४९/२०२४ बी. एन. एस कलम ६४ (२) (आय) (एम), ६५ (१),७४, |७५ (१) (१) (४), ७९, ३५१ (२) । बालकांचे लैगिंक अत्याचारापासुन संरक्षण कायदा २०१२ चे कलम ४,६,८,१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरील गुन्हाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली मापोसई सांगळे या करीत आहेत.

Exit mobile version