दै.तुफान क्रांती/दौंड:
माजी आमदार रमेश थोरात यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला असून सोमवारी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत अशी माहिती पत्रकारांशी बोलताना त्यांनी दिली.मागील काही दिवसांपूर्वी भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला परंतु ती खूप मोठी चूक झाली असे मत व्यक्त केले. शरद पवार यांची जाहीर माफी व दिलगिरी व्यक्त केली असून शरद पवार हे महाराष्ट्रच दैवत आहेत अशी भावना व्यक्त केली.
यावेळी पुढे बोलताना २९ तारखेला ३ वाजेपर्यंत AB फॉर्म देण्याची वेळ आहे त्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, (शरद पवार )गटाचे नेते जयंत पाटील व शरद पवार साहेब आपला निर्णय कळवतील असे सूचक वक्तव्य केले. जनता सांगेल तो निर्णय घेणार असल्याची माहिती यावेळी माजी आमदार रमेश थोरात यांनी दिली.