Site icon Tufan Kranti

आगामी सर्व निवडणुका ताकतीनिशी लढू व जिंकू: राजवर्धन पाटील

आगामी सर्व निवडणुका ताकतीनिशी लढू व जिंकू: राजवर्धन पाटील

 भाजप कार्यकर्त्यांनी कामास लागावे

इंदापूर 🙁 दि.६ फेब्रुवारी )
भारतीय जनता पार्टीचे केंद्र व राज्य पातळीवरील नेतृत्व हे भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. त्यामुळे आगामी काळात इंदापूर तालुक्यामध्ये होणाऱ्या सर्व निवडणुका भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वाखाली ताकतिनीशी लढू व जिंकू, असा निर्धार इंदापूर तालुका भाजप युवा मोर्चा कोअर कमिटीचे अध्यक्ष राजवर्धन पाटील यांनी मंगळवारी (दि.५) व्यक्त केला.
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांनी भारत सरकारच्या राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या (एन.सी.डी.सी.) जनरल कौन्सिलवर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची निवड केली आहे. त्या पार्श्वभूमीवर राजवर्धन पाटील यांनी पत्रकारांना वरील प्रक्रिया दिली.
                राजवर्धन पाटील पुढे म्हणाले, आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबरोबर लोकसभा, विधानसभा निवडणुका होणार आहेत. या सर्व निवडणुकांसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे.
आपला तालुका हा आपल्या विचारांचा आहे. गुण्यागोविंदाने नांदनारा आहे. एकमेकांच्या सुखदुःखात एकत्र येणारा आहे. हीच परंपरा कायम ठेवण्यासाठी आपल्याला  हर्षवर्धनभाऊ पाटील यांच्या पाठिमागे  उभे राहावे लागणार आहे. इंदापूर तालुक्यातील भाजपसाठी आगामी राजकीय भविष्यकाळ हा निश्चितपणे उज्वल राहणार असल्याने, आगामी सर्व निवडणुकांसाठी भाजप कार्यकर्त्यांनी जिंकू या निर्धाराने आजपासून काम सुरु करावे, असे आवाहन राजवर्धन पाटील यांनी याप्रसंगी केले.
    तालुक्यातील जनतेच्या हिताचे निर्णय राज्य सरकार तसेच केंद्र सरकार घेत आहे. दूध दर असेल, कामगारांचे प्रश्न देखील मार्गी लागले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देशात उत्तम काम करीत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदींचे खंबीर पाठबळ आपल्या पाठीशी असल्याने आगामी सर्व निवडणुका जिंकण्यासाठी आपणास कोणतीही अडचण येणार नाही.
Exit mobile version