आबासाहेबांची चळवळ अजूनही जिवंत आहे हे दाखवून देण्यासाठी डॉ.बाबासाहेब देशमुख यांना विजयी करा- मा.खा.राजू शेट्टी
सांगोला:
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सांगोला तालुक्यात शेकापला जाहीर पाठींबा देत धंदेवाईक राजकारणांनी जो उच्छांद मांडला, जो पैशांचा बाजार मांडला आहे. त्याला मूठमाती द्या आणि अजूनही आबासाहेबांची चळवळ जिवंत सांगोला तालुक्यात जिवंत आहे हे दाखवून देत चळवळीचे नाते जपण्यासाठी डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या शिट्टी या चिन्हावर मतदान करुन निवडून द्यावे, असे आवाहन केले. यावेळी राजू शेट्टी यांनी पाठिंबा दिल्याबद्दल शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉ.अनिकेत देशमुख यांनी त्यांचे आभार मानत आपल्या विश्वासास पात्र राहून यापुढील काळात काम करुन असे आश्वासन दिले.
यावेळी बोलताना मा.खा.राजू शेट्टी म्हणाले, सांगोला विधानसभा हा स्व.भाई.गणपतराव देशमुख यांचा हक्काचा मतदार संघ आहे. महाराष्ट्रामध्ये विक्रमी वेळा या मतदार संघातून आबासाहेब निवडून आलेले होते. त्यामुळे या मतदार संघामध्ये परिवर्तन महाशक्तीने आपला उमेदवार देण्याचे टाळले आहे. दुर्दैवाने महाविकास आघाडीने त्यांना उमेदवारी देत असताना अन्याय केला. आम्ही मात्र चळवळीची जाण ठेवून चळवळीचे भिष्माचार्य, शेतकरी, कष्टकरी, गोरगरीबांचे आधारस्तंभ असणारे आबासाहेब यांनी जवळजवळ 50 वर्षे या भागातील लोकांची गर्हाणी विधानसभेत मांडली होती. त्याची जाणीव ठेवून त्यांचे नातू डॉ.अनिकेत देशमुख व या मतदार संघामध्ये निवडणूक लढवित असलेले डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या पाठीशी आम्ही आहोत. कारण आम्ही चळवळीचे भाऊबंदकी पाळतो, सांभाळतो व जपतो. त्यामुळे सांगोला तालुक्यातील आणि पंढरपूर तालुक्यातील काही गावांचा समावेश असणार्या या मतदारसंघातील कष्टकर्यांनी, शेतकर्यांनी, गोरगरीबांनी सर्वसामान्यांनी चळवळीची जान ठेवून, चळवळीचे नाते जपण्यासाठी डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या शिट्टी या चिन्हावर मतदान करुन धंदेवाईक राजकारणांनी जो उच्छांद मांडला, जो पैशांचा बाजार मांडला आहे. त्याला मूठमाती द्या आणि अजूनही आबासाहेबांची चळवळ सांगोला तालुक्यात जिवंत आहे हे दाखवून द्या, असे आवाहन शेतकरी नेते राजू शेठ्ठी यांनी केले.