पुळुज प्रकरणातील आरोपीवर तातडीने गुन्हे दाखल करा अन्यथा तीव्र आंदोलन;पुरोगामी संघर्ष परिषदेची मागणी

पंढरपूर-
 पुळूज (तालुका पंढरपूर) येथील उमेश कांबळे हा त्याच्या मित्राच्या घरी गेला असता त्याच्या आजीने मांगा महारांच्या नादाला कशाला लागतय म्हणून हिनवल्यामुळे उमेश कांबळे याने असे जातीवरून अपशब्द बोलू नका असे सुनावल्यामुळे हा राग मनात धरून भोसले घरातील दोन बंधूंनी उमेश कांबळे याला पाठीमागून येऊन कुराडीने वर्मी घाव घालून जखमी करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे आयपीसी कलम 307 अंतर्गत अदखलपात्र व अजामीन गुन्हा दाखल करून ॲट्रॉसिटी ॲक्ट गुन्हाही नोंद करावा तसेच आरोपींना जर पोलिसांनी जामीन मंजूर केल्यास सदर पोलिसांच्या वर तातडीने नीलंबनाची कारवाई करण्याची व राज्यात मातंग समाजावर वारंवार हल्ले होत असल्याबाबत सखोल चौकशी करण्याबरोबरच इतरही मागण्या पंढरपूरचे तहसीलदार,पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांना पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने युवकचे प्रदेशाध्यक्ष अमितजी अवघडे यांचे प्रमुख उपस्थितीत  व जिल्हाध्यक्ष उमेश वाघमारे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
 सदर मागण्यांची अंमलबजावणी न झाल्यास जिल्हाधिकारी सोलापूर यांचे कार्यालय समोर उग्र निदर्शने करण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.  सदर शिष्टमंडळात चंद्रकांत वाघमारे, माऊली वाघमारे,सुनिल कांबळे, विशाल ठोंबरे,अजिंक्य वाघमारे इत्यादी पुरोगामी संघर्ष परिषदेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थि होते.
ALSO READ  मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ होणार- मनोज जरांगे यांचा इशारा

Leave a Comment

‘झलक दिखला जा 11’वर अत्यंत गंभीर आरोप, लोकांचा संताप, शिव ठाकरेचे चाहते आक्रमक TOP POINTS Farmer’s Protest: Continuing Until Demands Met Best Phones Under 20,000 Top 10 Wireless Earbuds Under 2000