मतपरिवर्तन ..
नक्षलवादींचे व्हावे
संपूर्ण मतपरिवर्तन
अंतर्बाह्य स्वच्छता
बदलो हिंसक वर्तन
हिंसाचार मातलेला
पुन्हापुन्हा आवर्तन
रक्तरंजीतअत्याचार
झाकोळले सद्वर्तन
सखोल करा विचार
का झाले अधःपतन
तरुण पिढी कु मार्गे
का करती अनुवर्तन
अ स्वस्थ समाजाचे
ते शोधावे मूलायतन
भुकेल्या वाघासमोर
उपयोगी नसे किर्तन
निर्ढावली गुन्हेगारी
सद्भाव होई अचेतन
सोपा मार्ग हिंसाचार
उद्रेकाचे बनेआयतन
दुर्लक्षित वागणूकीत
सतत हो अव जतन
अवैधमार्ग अवलंबन
करे मानवता कर्तन
मुख्यप्रवाही आणायं
आधी करा प्रबोधन
माणूस मानून त्यांना
करे विश्वास संपादन
कठोर शिक्षा ताडण
अंतिममार्ग रे शासन
शाश्वती खात्री व्हावी
इथे चालते सुशासन
– हेमंत मुसरीफ पुणे