बजेट ..
तोचि खेळ पहावा
जुन्या तिकीटावर
ठरलेल्या प्रतिक्रिया
बजेट आल्या नंतर
सत्ताधारी आनंदात
नाही काही गत्यंतर
बजेट हे आशावादी
रे होणार स्थित्यंतर
विरोधक ओरडतात
भुमिका तीचं निरंतर
चर्चात्याचं वांझोट्या
चालत राहती नंतर
कुणीम्हणे सापडला
प्रगती गतीचा मंतर
बजेट निमित्त मिळे
खरा खुरा बा मैतर
कुणी बोले वाढणारं
गरीबी श्रीमंती अंतर
वरुन बाळ ते गोंडस
माहिती नाही भितर
पाहू या कसे होईल
पुढे मागे खरे चित्तर
नव्या कुपीत घातले
जुने पुराणे ते अत्तर
– हेमंत मुसरीफ पुणे.