Site icon Tufan Kranti

पुनर्विकास

पुनर्विकास
फुलप्रुफचं बनवावे
पुनर्विकास   धोरण
विस्थापित हक्काचे
सतत  व्हावे स्मरण
झोपडपट्ट्या असे
बिल्डरांसाठी कुरण
फायद्यासाठी त्यांचे
कसे गरीबांचे मरण
दाखवता गोड स्वप्ने
परिपूर्णता विस्मरण
वाटपहात राही सारे
निर्माल्य होते तोरण
फोफावतो भ्रष्टाचार
आडवे ये राजकारण
झारीतले  शुक्राचार्य
आडवे पडे अकारण
जोशात करे उद्घाटन
मिडीयाला ये स्फुरण
चित्रे  विलोभनीय ती
डोळे होती विस्फरण
विकास होई स्वताचा
मनसोक्त  उदर भरण
विस्थापित कॅम्पमध्ये
स्वप्नाचे बने शिकरण
– हेमंत मुसरीफ पुणे 
Exit mobile version