पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी(ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये मंगळवार दिनांक ६ फेब्रुवारी २०२४ रोजी “कॅम्पस प्लेसमेंट ओरीएंटेशन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी प्रेप इन्स्टा चे केदार काशीकर, रामकुमार जी हे प्रमुख मार्गदर्शक होते. या कार्यक्रमासाठी उपस्थित केदार काशीकर यांचे महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. कैलाश करांडे तर रामकुमार जी याचे प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. अनिल निकम यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यादरम्यान रामकुमार जी यांनी प्रेप इन्स्टा चा वापर कॅम्पस प्लेसमेंट च्या तयारीसाठी कसा उपयुक्त आहे तसेच यामध्ये ॲप्टीट्युड पासुन मुलाखत देण्याच्या तयारी पर्यंत चे सर्व बाबींची सविस्तर माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना दिली. तसेच वेगवेगळ्या बहुराष्ट्रीय नामांकित कंपनी मध्ये काम करीत असताना उपयुक्त ठरणारे अद्ययावत ट्रेनिंग कोर्सेस यादरम्यान विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देऊन प्रेप इन्स्टा याविषयावर सखोल व महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
हे देखील वाचा – २०४७ पर्यंत देशात भाजपची सत्ता कायम राहणार – प्रशांत परिचारक
यावेळेस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे बोलताना म्हणले, विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात आयोजित करण्यात येणारे विविध ट्रेनिंग व कार्यशाळा यामध्ये सहभागी होणे आवश्यक आहे. अशा कार्यशाळेतून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असतो. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अशा प्रकारे एक नवीन संधी उपलब्ध होत असुन जवळपास ६०० हून अधिक विद्यार्थ्यांनी यामध्ये नावनोंदणी केली असल्याचे डॉ. कैलाश करांडे यांनी सांगितले.
“कॅम्पस प्लेसमेंट ओरीएंटेशन” साठी महाविद्यालयातील प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या कार्यक्रमाचे सुञसंचालन व आभार प्रदर्शन ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ.समीर कटेकर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. दिपक गानमोटे, प्रा. अभिजित सवासे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
1 thought on “पंढरपूर सिंहगड मध्ये “कॅम्पस प्लेसमेंट ओरीएंटेशन” कार्यक्रम संपन्न”